
दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन
बुलढाणा प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलढाणा येथे दर महिन्याच्या प्रत्येक बुधवार व शुक्रवारी सुरू असलेले दिव्यांग तपासणी बोर्डाचे कामकाज ३१ ऑक्टोबर २०२६ पासून पूर्णपणे बंद करण्यात येत आहे. दिव्यांग प्रमाणपत्र वितरण प्रणाली राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे देण्यात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे
जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र वितरण प्रणाली राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यानुसार राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बुलढाणा यांना दिव्यांग प्रमाणपत्रासाठी आवश्यक लॉगिन आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हा रुग्णालय, बुलढाणा येथे दर महिन्याच्या प्रत्येक बुधवार व शुक्रवारी सुरू असणारे दिव्यांग तपासणी बोर्डाचे कामकाज ३१ ऑक्टोबर २०२६ पासून बंद करण्यात येणार आहे
दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग तपासणी तसेच दिव्यांग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी यापुढे राजमाता जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बुलढाणा येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, बुलढाणा यांनी केले आहे.
0000



