vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

तिवसा तहसील कार्यालयाचा मौजे विरगव्हाण येथे ‘ग्रामभेट’ व ‘गाव मुक्काम’ दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

तिवसा तहसील कार्यालयाचा मौजे विरगव्हाण येथे ‘ग्रामभेट’ व ‘गाव मुक्काम’ दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाचा पुढाकार

अमरावती, प्रतिनिधी) : तिवसा तहसील कार्यालयाच्यावतीने गाव मुक्काम व ग्रामभेट उपक्रमांतर्गत तालुक्यातील विरगव्हाण गावात गुरुवारी,२९ ऑक्टोबर रोजी गाव मुक्काम करण्यात आला. या गावभेटी दरम्यान, दुष्काळ सदृश्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांचे मनोबल वाढवून त्यांना दिलासा देण्यात आला आणि शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास निर्माण करण्यात आला. या भेटीद्वारे प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वय व विश्वास अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने सकारात्मक प्रयत्न करण्यात आले.

 महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ग्रामभेट व ‘गाव मुक्काम’ उपक्रम राबविण्यात येत आहे. विरगव्हाण येथील ग्रामभेटीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ज्या शेतकऱ्यांची नावे पात्र यादीत समाविष्ट झाली आहेत, त्यांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे व पुढील कर्जप्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, अनेक शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार वारसाचा दाखला प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. ज्या शेतकऱ्यांची नावे अद्याप यादीत आलेली नाहीत, त्यांना पुढील याद्यांमध्ये पात्रतेनुसार नाव समाविष्ट होण्याबाबत माहिती देऊन प्रशासनाकडून आश्वस्त करण्यात आले.

ग्रामभेटीदरम्यान दुष्काळ निवारणासाठी आवश्यक उपाययोजना, जलसंधारणाची कामे, रब्बी हंगामाचे नियोजन आणि विरगव्हाण जलाशयातील उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य व्यवस्थापन यावर चर्चा करण्यात आली. यासोबतच मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना तसेच विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. उपलब्ध जलस्रोतांचा काटकसरीने वापर करून शेती व पाणी व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले

           महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम अभियानांतर्गत ग्रामस्तरीय समितीच्या पुढाकाराने गावातील ८ प्रकरणांचा गावातच यशस्वीरीत्या निपटारा करण्यात आला. स्थानिक पातळीवर वादांचे निराकरण करून गावात सलोखा, सामंजस्य व सामाजिक एकोपा वृद्धिंगत करण्याच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल ग्रामस्तरीय समिती व ग्रामस्थांचे विशेष अभिनंदन करण्यात आले.

      या ग्रामभेटीत पोलीस निरीक्षक,गटविकास अधिकारी, महावितरणचे उपअभियंता, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, सहाय्यक निबंधक, जलसंपदा विभागाचे अधिकारी, तिवसा तहसील कार्यालयातील सर्व नायब तहसीलदार तसेच विविध विभागांचे तालुकास्तरीय प्रमुख व ग्रामस्तरीय अधिकारी उपस्थित होते. या ग्रामभेटीमुळे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना थेट मदत व मार्गदर्शन मिळाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

 

०००००

संबंधित पोस्ट

असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीजच्या राष्ट्रीय कुलगुरू महासभेचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन‘विकसित भारत’ घडविण्यासाठी नवोपक्रम व संशोधन महत्वाचे : राज्यपाल जिष्णू देव वर्मा…

महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून सात सदस्यांची राज्यसभेसाठी द्विवार्षिक #निवडणूक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून प्रसिद्ध

गतीमान प्रशासनासाठी ई-ऑफिस प्रणालीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा–अपर मुख्य सचिव विकास खारगे

vishwatmaklokswamivarta

गोंदिया जिल्ह्यातील कृषी विकासाच्या सर्व प्रस्तावांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश- कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

तासगाव व पलूस येथील शासकीय वसतिगृहाचा लाभ घेण्याचे आवाहन

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके 30 जानेवारीपर्यंत पाठविता येणार

vishwatmaklokswamivarta