vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भारतात ओमिक्राॅन विषाणूचा शिरकाव झाल्याने राज्य सरकारकडून  सूचना, दोन मास्क वापरणे आवश्‍यक..!

भारतात ओमिक्राॅन विषाणूचा शिरकाव झाल्याने राज्य सरकारकडून  सूचना, दोन मास्क वापरणे आवश्‍यक..!

मुंबई प्रतिनिधी  : भारतात ओमिक्राॅन विषाणूचा शिरकाव झाल्याने राज्य सरकारकडून अधिक खबरदारी बाळगली जात आहे. अशात राज्याच्या कोविड टास्क फोर्सकडूनही सरकारला विविध सूचना केल्या जात आहे. ओमिक्राॅन हा कोरोनाचा नवीन विषाणू अधिक झपाट्याने पसरणारा असून त्याचा संसर्ग रोखण्यासाठी दोन मास्क वापरणे गरजेचे असल्याचे मत कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले आहे.

भारतात ओमिक्राॅनचे जे दोन रुग्ण आढळले, त्यांच्या संपर्कातील नागरिकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. दक्षिण आफ्रिकेत आता ओमिक्राॅन बाधित रुग्णांचे रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण वाढत असले तरी आयसीयूतील रुग्ण वाढलेले नाहीत. ही एक दिलासादायक बाब आहे. पुढील तीन ते सहा आठवड्यात नेमके चित्र स्पष्ट होईल, असे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. तसेच, ओमिक्राॅनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच जास्त निर्बंध लादले पाहिजे, असेही डॉ. जोशी म्हणाले.लसीकरणामुळे कोविड होत नाही असे नाही; मात्र त्यामुळे तीव्र आजाराची शक्यता कमी होते. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशी ओमिक्रॉनवर प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे तातडीने लसीकरण होणे गरजेचे आहे. ओमिक्राॅनविरोधात डबल मास्किंग व डबल लसीकरण हेच सूत्र पाळायला हवे, असे डाॅ. जोशी म्हणाले.ओमिक्रॉन संशयितांवर १८ रुग्णालयांमध्ये उपचार ओमिक्रॉनचा प्रसार अटकावासाठी पालिकेने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यात ओमिक्रॉनच्या संशयितांसाठी १८ ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या तपासण्या बहुतांश परदेशी प्रवाशांच्या करण्यात येत आहेत. त्यात कोविड पॉझिटिव्ह आल्यास त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जात आहे. त्यासाठी १८ रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. दरम्यान, राज्य कोविड टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ओमिक्राॅनला रोखण्यासाठी पुन्हा मूलभूत गोष्टींना प्राधान्य द्यावे लागेल. रुग्णांचे संपर्क ट्रेसिंग, चाचणी आणि उपचार करावे लागतील. प्रत्येक संशयितामागे जवळपास २०० संपर्कांच्या चाचण्या केल्या जात आहेत. या विषाणूचा व्यापक प्रसार होण्यासाठी एक किंवा दोन महिने लागू शकतात. त्यामुळे आताच पूर्ण खबरदारी बाळगायला हवी.- डाॅ. राहुल पंडित, सदस्य, टास्क फोर्स.

संबंधित पोस्ट

मित्र’चा पुढाकारः१९ रोजी विकास परिषदेत विचारमंथन;तज्ज्ञ व्यक्ति तयार करणार जिल्ह्याच्या विकासाची ‘ब्लू प्रिंट’

vishwatmaklokswamivarta

नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित· राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात,१८९२.६१ कोटी रुपये जमा..

vishwatmaklokswamivarta

कॉमेडियन भारती सिंहच्या अडचणीत मोठी वाढ! भारती सिंह आणि पती  विरोधात एनसीबीकडून  आरोपपत्र दाखल..

vishwatmaklokswamivarta

गुजरात येथील ‘कर्णावती समन्वय परिवार गुजरात’ या संस्थेकडून उत्तम धर्मप्रसार कार्यासाठी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सनातन संस्थेचा सन्मान !गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांच्या हस्ते सनातन संस्थेचे श्री. चंद्रशेखर कद्रेकर यांनी स्वीकारला सन्मान !

राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री  राधाकृष्ण विखे- पाटील आढावा 

vishwatmaklokswamivarta

भाजप आणि शिवसेना वाद आता दिल्लीपर्यत, सोमय्या यांच्यावरील हल्ल्याबाबत भाजपचे शिष्टमंडळ गृहसचिवांना भेटणार