
महाराष्ट्र कोरोनाच्यातिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. 24 तासांत 2 हजार 172 नवे रुग्ण वाढले आहेत. मुंबईतली रुग्णसंख्याही हजारावर पोहोचली , जानेवारी-फेब्रुवारीत रुग्ण वाढणार आहेत, असा धोक्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्र कोरोनाच्यातिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. 24 तासांत 2 हजार 172 नवे रुग्ण वाढले आहेत. मुंबईतली रुग्णसंख्याही हजारावर पोहोचली , जानेवारी-फेब्रुवारीत रुग्ण वाढणार आहेत, असा धोक्याचा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर आहे. कारण अनेक महिन्यांनंतर राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झालीय. राज्यात 24 तासांत दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईचा आकडाही एक हजारांपलिकडे गेलाय. राज्यात 2 हजार 172 तर मुंबईत 1 हजार 377 रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत राज्यात 22 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय.
राज्यात गेल्या 24 तासांत 50 टक्के रुग्ण वाढले आहेत. तर मुंबईतही संख्या तब्बल 70 टक्क्यांनी वाढलीय. वाढलेल्या रुग्णसंख्येचा पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनीही राज्यात कठोर निर्बंधाचे संकेत दिले आहेत. तसंच जानेवारी आणि फेब्रुवारीत रुग्णांची संख्या अधिक वाढण्याची शक्यताही राजेश टोपेंनी वर्तवलीय. तर लवकरच तिसरी लाट येणार असल्याची भीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही व्यक्त केली.



