vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

कर्नाटकात बजरंग दल कार्यकर्त्याची हत्या, शाळा- कॉलेजात पोलीस तैनात

कर्नाटकात बजरंग दल कार्यकर्त्याची हत्या, शाळा- कॉलेजात पोलीस तैनात

कर्नाटक प्रतिनिधी कर्नाटकात सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावर अद्याप पडदा पडल्याचं चित्र नाही. दिवसेंदिवस कट्टर समूहांकडून विद्यार्थ्यांना भडकवण्याचा प्रकार सुरू असून यामुळे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये तणावाचं वातावरण आहे. (Hindu Activist Murder in Karnataka)कर्नाटकातील शिवमोग्गा येथे रविवारी रात्री बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याची हत्या करण्यात आली. या हत्येनंतर परिसरात आणखी तणाव वाढला. या 26 वर्षांच्या कार्यकर्त्याने हिजाब प्रकरणासंदर्भात सोशल मीडियावर काही मजकूर प्रसिद्ध केला. परिसरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. कलम 144 लागू करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने

काही लोक बाईकवर आले आणि त्यांनी हर्षवर धारदार शस्त्राने वार केल्याचं प्रत्यक्षदर्शींना सांगितलं. हत्येनंतर संतप्त लोकांनी परिसरात जोरदार तोडफोड केली. गाड्या पेटवल्या. हा गोंधळ वाढत असल्याचे पाहून शिवमोग्गामध्ये कलम 144 लागू करण्यात आलेंआहे. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांना 23 फेब्रुवारीपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कोणी मारलं माहिती नाही…’4-5 तरुणांच्या टोळक्याने तरुणाची हत्या केली. यामागे कोणत्याही संघटनेचा हात असल्याची मला माहिती नाही. शिवमोग्गा येथे कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या हद्दीतील शाळा आणि महाविद्यालये दोन दिवस बंद ठेवण्यात आल्याची माहिती कर्नाटकचे गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांनी दिली.

संबंधित पोस्ट

आत्मनिर्भर भारताच्या ताकदीची ऑपरेशन सिंदूरच्या यशातून प्रचीती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खापरखेड्यात तिरंगा यात्रेचे आयोजन

कोकण किनारपट्टीला २५ जून रोजीचे रात्रौ ८-३० पर्यंत उंच लाटांचा इशारा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे व सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट-राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

vishwatmaklokswamivarta

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई;ठाण्यात 20.75 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून  श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या निधनावर शोक व्यक्त….

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकाऱ्यांकडून मतमोजणी केंद्राची पाहणी, मतमोजणी अनुषंगाने तयारीचा घेतला आढावा

बंजारा समाजाच्या प्रश्नांची जाण अडचणींना दूर करण्याचा पूर्ण प्रयत्न : लोकसभा अध्यक्ष ओम बिरला