vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवसेना- केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे संघर्ष ! मुंबई मनपाचं पथक नारायण राणे यांच्या बंगल्यावर…

 शिवसेना- केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे संघर्ष ! मुंबई मनपाचं पथक नारायण राणे यांच्या बंगल्यावर…

[ मुंबई प्रतिनिधी: शिवसेना आणि नारायण राणे वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतल्या जुहू इथल्या अधीश बंगल्याची पाहणी करण्यासाठी मुंबई महापालिकेचं पथक दाखल झालं आहे.

बंगल्याची पाहणी करण्यासंदर्भात मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती. त्यानुसार आज आठ लोकांचं पथक राणे यांच्या अधीश बंगल्यावर दाखल झालं आहे.

मुंबई महापालिकेकडून (BMC Officers) नारायण राणेंच्या (Narayan Rane) जुहू येथील बंगल्याची तपासणी आणि मोजमाप करण्यात आलं होतं. के वेस्ट वॉर्ड कडून नारायण राणे यांना नोटीस देण्यात आली होती. 2017 मध्ये नारायण राणेंच्या जुहू येथील अधिश बंगल्याबाबत महापालिकेकडे तक्रार आली होती.

या बंगल्याचे बांधकाम सिआरझेडचे उल्लंघन असल्याबाबत तक्रार आरटीआय कार्यकर्ता संतोष दौंडकर यांनी तक्रार दाखल केली होती.

महापालिकेच्या पथकाला नारायण राणे यांच्या बंगल्यात अनियमितता आढळणार का? अधीश बंगल्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित पोस्ट

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील ड्रग्ज आणि क्रूज पार्टी आर्यन प्रकरणात  – राष्ट्रवादीचा सुनिल पाटील सूत्रधार; भाजपचा गंभीर आरोप

vishwatmaklokswamivarta

दिल्लीच्या गोकुळपुरीत मोठी दुर्घटना; आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर आरामबस उलटून 4 ठार, 23 जखमी; एकाच रस्त्यावर दिवसातील दुसरी घटना

vishwatmaklokswamivarta

पाण्याची आवर्तने देताना कोणावरही अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या-जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ मधील भागात रेड अलर्ट जारी..

vishwatmaklokswamivarta