
मुंबई मध्ये आज मध्य, हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक; जाणून घ्या अपडेट्स…
मुंबई प्रतिनिधीआज 24 एप्रिल दिवशी मुंबईत मध्य (Central Line) आणि हार्बर मार्गावर (Harbour Line) मेगा ब्लॉक आहे तर पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रीच्या वेळेस काम हाती घेतल्याने दिवसकालीन मेगा ब्लॉक नसणार आहे.
मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असलेले लोकल ट्रेन (Local Train) रविवारी देखभालीच्या कामांसाठी उशिराने धावत असते. दरम्यान रविवारी मेगा ब्लॉक (Mega Block) घेऊन ही कामं पूर्ण केली जातात. आज 24 एप्रिल दिवशी मुंबईत मध्य (Central Line) आणि हार्बर मार्गावर (Harbour Line) मेगा ब्लॉक आहे तर पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रीच्या वेळेस काम हाती घेतल्याने दिवसकालीन मेगा ब्लॉक नसणार आहे.
मध्य रेल्वेवर आज सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान मेगाब्लॉक आहे. सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत सेवा विस्कळित असणार आहे. सीएसएमटी स्थानकातून सुटणार्या स्लो ट्रेन विद्याविहार पर्यत फास्ट ट्रॅकवर वळवल्या जातील. घाटकोपर वरून सीएसएमटीकडे चालवल्या जाणार्या ट्रेन देखील अप फास्ट मार्गावरून धावतील.
पनवेल-वाशी मार्गावरील रेल्वे सेवा नेरूळ, बेलापूर, खारकोपर या मार्गांवरून चालवल्या जाणार आहेत. तर सीएसएमटी-पनवेल- सीएसएमटी या मार्गावरील रेल्वेसेवा आज 11 ते 4 पर्यंत बंद ठेवली जाणार आहे



