vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महागाई विरोधात डाव्या पक्ष्यांनी पुकारले देशव्यापी आंदोलन…

महागाई विरोधात डाव्या पक्ष्यांनी पुकारले देशव्यापी आंदोलन…

 

मुंबई प्रतिनिधी: देशात वाढत चालेल्या महागाई आणि बेरोजगारीविरुद्ध देशभरातील डाव्या पक्षांनी २५-३१ मे दरम्यान देशव्यापी आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन महाराष्ट्रात जोरदारपणे यशस्वी करा अशी हाक राज्यातील डाव्या पक्षांनी दिली आहे. राज्यस्तरीय ऑनलाईन पार पडलेल्या बैठकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाणा पक्ष आणि भारताचा कम्युनिस्ट पक्ष यांच्या संयुक्तिक  बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

 

 

२५ ते ३१ मे दरम्यान राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदार कार्यालयावर जनतेच्या वतीने उग्र मोर्चे आणि निदर्शने करत केंद्रातील भाजपच्या जनताविरोधी, कॉर्पोरेटधार्जिण्या आणि धर्मांधतेला उत्तेजन देणाऱ्या धोरणाचा निषेध करावा, असे आवाहन या बैठकीत डाव्या पक्षांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

 

 

बैठकीचे ‘माकप’चे डॉ. अशोक ढवळे, ‘भाकप’चे प्रकाश रेड्डी, ‘शेकाप’ चे राजू कोरडे तसेच इतर अन्य पक्षाचे कार्यकर्ते उपस्थितीत होते. या आंदोलनात संयुक्त शेतकरी कामगार मोर्चा, जन आंदोलनांची संघर्ष समिती, इत्यादी संघटनाही सहभागी होणार आहेत.

संबंधित पोस्ट

कौशल्यपूर्ण प्रशिक्षण घेऊन यशस्वी उद्योजक व्हा- जिल्हाधिकारी अशोक काकडे- एनएसएसच्या विद्यार्थ्यांना कृषि उद्योग दूतचे प्रशिक्षण 

vishwatmaklokswamivarta

सांगली फळ महोत्सवात नऊ लाखांची उलाढाल – पणन अधिकारी ओंकार माने- शेतकऱ्यांनी मानले जिल्हाधिकारी अशोक काकडे, पणन विभागाचे आभार…

vishwatmaklokswamivarta

मुंबईत 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी ,मुंबई पोलीस

vishwatmaklokswamivarta

गोरेगाव ते मुलुंड घोडागाडी शर्यत प्रकरणी चौघांना अटक, मुंबई पोलिसांची कारवाई..

जालन्यात प्रथमच बुद्धिबळ स्पर्धेचे रंगतदार आयोजन!जालना गणेश फेस्टिव्हल तर्फे खुली, 15 व 10 वर्षाखालील गटांत स्पर्धा – विजेत्यांना रोख पारितोषिके व ट्रॉफी

ठाणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी पोलीस ठाणे येथे #स्वातंत्र्याचाअमृतमहोत्सव निमित्तविद्यार्थ्यांसोबत प्रभात फेरी काढून त्यांना राष्ट्रध्वजचा अभिमान बाळगावा याबाबत जनजागृती रॅली करण्यात आली