vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यातंत्रज्ञान

इस्रोने सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपीत केला पृथ्वी निरीक्षण उपग्रह…

इस्रोने सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपीत केला पृथ्वी निरीक्षण उपग्रह…

 

इस्त्रो (ISRO) ने सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा येथून पृथ्वी निरीक्षण उपग्रह (EOS-02) वाहून नेणारा SSLV-D1 आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह-आझादीसॅट प्रक्षेपित केला.

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्त्रो (ISRO) ने सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा येथून पृथ्वी निरीक्षण उपग्रह (EOS-02) वाहून नेणारा SSLV-D1 आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह-आझादीसॅट प्रक्षेपित केला. हे प्रक्षेपण अनेक कारणांसाठी खास आहे. हा SSLV-D1/EOS-02 ‘लाँच-ऑन-डिमांड’ तत्त्वावर 500 किलोपर्यंतच्या उपग्रहांचे लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये प्रक्षेपण करतो.

 

इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, रॉकेट एसएसएलव्ही-D1 (SSLV-D1)ने आज सकाळी 9.18 वाजता श्रीहरिकोटा (Sriharikota) येथील लॉन्च पॅडरुन उड्डाण घेतले. जास्तीत जास्त 500 किलोग्राम इतके वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले हे रॉकेट एक पृथ्वी अवलोकन उपग्रह 02 वाहून नेईन. याला आगोदर ‘माइक्रोसेटेलाइट-2 ए'(‘Microsatellite-2A’) म्हणून ओळखले जात होते. याचे वजन साधारण 142 किलोग्राम आहे.

SSLV-D1/EOS-02 Mission: स्पेस एजन्सीने रविवारी आपल्या वेबसाइटवर सांगितल्यानुसार, काउंटडाउन 02.26 तासांनी सुरू झाले . EOS-02 आणि AzaadiSAT उपग्रहांना पृथ्वीच्या निम्न कक्षेत ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SHAR) येथील पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून सकाळी 9.18 वाजता लिफ्ट-ऑफ होणार आहे. ISRO ने माहिती देताना म्हटले आहे की, आझादीसॅटमध्ये (AzaadiSAT ) 75 वेगवेगळे पेलोड आहेत, प्रत्येकाचे वजन सुमारे 50 ग्रॅम आहे, जे देशभरातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी विकसित केले आहे, ज्यांना हे पेलोड तयार करण्यासाठी मार्गदर्शन प्रदान करण्यात आले होते, असे ISRO म्हणते.

‘स्पेस किड्झ इंडिया’ विद्यार्थी संघाच्या ग्राउंड सिस्टमचा वापर या उपग्रहाकडून डेटा प्राप्त करण्यासाठी केला जाईल. दरम्यान, EOS-02 – एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह – जो SSLV द्वारे देखील वाहून नेला जाणार आहे. तो कृषी, वनीकरण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आहे

 

संबंधित पोस्ट

21 जून: आंतरराष्ट्रीय योग दिन योगसाधना हीच निरोगी जीवनाची गुरुकिल्ली…

आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील,आदिवासी पाड्यांना मूलभूत सोयी उपलब्ध करुन द्या- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

सार्वजनिक गणेशमंडळ स्थापनेसाठी ४९० पैकी २८९ मंडळांना परवानगी;सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सुटीच्या दिवशीही सुरु ..

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुका मौजे शिरजगाव मोझरी येथे आज सकाळी 11.00 वाजता भूकंपाचे सौम्य धक्के

vishwatmaklokswamivarta

व्यवस्थापन लेखांकन दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते चर्चासत्राचे उद्घाटन संपन्न,तिसरी आर्थिक महासत्ता बनविण्यात व्यवस्थापन लेखापालांची भूमिका महत्वाची