vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन..

विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे धरणे आंदोलन..

गडचिरोली प्रतिनिधी : राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे सरकार्यवाह तथा आमदार श्री. सुधाकर अडबाले व माजी आमदार व्हि. यू. डायगव्हाणे यांच्या नेतृत्वात मंगळवार दि. १० मार्च २०२६ रोजी दुपारी ३ ते ५ वाजेपर्यंत विदर्भातील सर्व माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान हे आंदोलन होणार असून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेने केले आहे.राज्यातील खाजगी, स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे संचालित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, खाजगी अनुदानित शाळा, विजाभज तसेच आदिवासी आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

या आंदोलनात राज्यातील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व राज्य कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त परंतु नंतर १०० टक्के अनुदान मिळालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना देणे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीवरील बंदी उठविणे, शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरणे, शाळांना सातव्या वेतन आयोगावर आधारित १०० टक्के वेतनेत्तर अनुदान देणे, तसेच शिक्षकांना १०-२०-३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करणे अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. याशिवाय नक्षलग्रस्त भागात कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांना 15% नक्षल ग्रस्त भत्ता देणे, अंशतः अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सुविधा व इतर सेवा लाभ देणे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी २० पटाखालील शाळा बंद न करण्याची मागणी, तसेच राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांची रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणीही करण्यात येणार आहे.अशा विविध मागण्या असून

या आंदोलनात विदर्भातील सर्व जिल्ह्यांतील संघटनेचे प्रांतीय पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा कार्यवाह तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हान विमाशी संघटनेचे प्रांतीय अध्यक्ष अरविंद देशमुख, उपाध्यक्ष रमेश काकडे, जयप्रकाश थोटे, जयकुमार सोनखासकर, विजय ठोकळ, चंद्रशेखर रहागंडाले, बाळासाहेब गोटे, भूषण तल्हार,यांनी केले. तसेच नागपूर विभागातील पदाधिकारी, सदस्य आणि शिक्षक-कर्मचारी यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

सागरी सुरक्षेसाठी १५ हाय स्पीड गस्ती नौका लवकरच दाखल होणार – मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील 187 गावांमध्ये ‘जन भागिदारी अभियान’Ø 18 ते 25 मे या कालावधीत विविध उपक्रम व शिबिरांचे आयोजन

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला

नगरपरिषद निवडणूक : जिल्हाधिकाऱ्यांकडून ईव्हीएम कमिशनिंग व मतदान केंद्रांची पाहणी*

vishwatmaklokswamivarta

रेल्वे दुहेरीकरण प्रकल्पांतर्गत वसगडेतील बाधित शेतजमिनींच्या भूभाडे निश्चितीसाठी 30 मे पर्यंत स्थळ पंचनामे करावेत- जिल्हाधिकारी अशोक काकडे

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात भाडेतत्वावर भोजनकक्ष, उपहारगृहासाठी 25 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित