vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील,आदिवासी पाड्यांना मूलभूत सोयी उपलब्ध करुन द्या- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील,आदिवासी पाड्यांना मूलभूत सोयी उपलब्ध करुन द्या- आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

            मुंबई, प्रतिनिधी: आरे परिसर व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांना आवश्यक त्या मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी सांगितले. तसेच आरे परिसरातील कुटुंबांना बजावण्यात आलेल्या निष्कासनाच्या नोटीसबाबतचा आढावाही त्यांनी घेतला.

मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीला जोगेश्वरी (पूर्व) येथील आमदार अनंत (बाळा) नर, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले की, आदिवासी पाड्यांवरील कोणत्याही कुटुंबाचे हक्क बाधित न होता कायद्यानुसार प्रक्रिया पार पाडावी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकूण ४३ आदिवासी पाडे आहेत. या पाड्यांवर नवीन नागरी सुविधा देण्यास उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. मात्र, अतिक्रमित क्षेत्रातील विद्यमान नागरी सुविधांच्या दुरुस्तीस शासनाने परवानगी दिली आहे. पाड्यांवरील आदिवासी बांधवांना नागरी सुविधा मिळाव्यात, यासाठी संबंधित विभागाने उच्च न्यायालयात प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना मंत्री डॉ. वुईके यांनी दिल्या.

आरे व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी पाड्यांवरील प्रश्नांचा सखोल आढावा पुढील आठवड्यात घेण्यात येईल, असेही मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५चे उद्घाटन जलव्यवस्थापनात नागरिकांचा सहयोग आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

आईचा मुलाबरोबर होणारा भावनिक संवाद हीच खरी मातृभाषा- जिल्हाधिकारी अशोक काकडे

महसूल विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मानवीय दृष्टीकोनाने अचूक कर्तव्य पार पाडावे- पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार- महसूल विभाग शासनाचा कणा व चेहरा असल्याची भावना – महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसीय प्रशिक्षणाचा शुभारंभ..

बेसा-बेलतरोडी-पिपळा व परिसरातील विकासात नागरी सुविधांवर भर – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा निवडणूकीसाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे सुयोग्य नियोजन…

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सार्वजनिक ठिकाणीसीसीटीव्हीसंदर्भात नवे धोरण आणणार– गृहराज्यमंत्री योगेश कदम