vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

कोण सुषमा अंधारे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  गटाच्या आमदार प्रताप सरनाईकांची यांच्यावर हल्लाबोल केला

 कोण सुषमा अंधारे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  गटाच्या आमदार प्रताप सरनाईकांची यांच्यावर हल्लाबोल केला

 

ठाणे प्रतिनिधी

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यातील भाषणामुळे सुषमा अंधारे हे नाव जास्तच चर्चेत आलं. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा सातत्याने शिंदे, फडणवीस सरकारवर हल्लाबोल सुरूच आहे. मोदींची मिमिक्री केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र तरी देखील त्यांची टीका सुरूच आहे. दरम्यान अंधारे यांच्या टीकेला शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. सुषमा अंधारे या कोण आहेत, त्यांनी आपला इतिहास तपासावा असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय.

 

पुढे बोलताना प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मला लोकांची विकास कामे करायची आहेत. या सुषमा अंधारे कोण आहेत? ज्यांनी काल पक्षात प्रवेश केला आणि आज बोलत आहेत. पक्षात येण्यापूर्वी त्यांनी अनेकदा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांवर टीका केली आहे.

 

सुषमा अंधारे यांनी आधी आपला इतिहास पहावा. अशी एखादी व्यक्ती जर मीरा-भाईंदर शहरात येऊन काहीही बोलत असेल तर ते चुकीचं आहे. आपण इथपर्यंत कशा पोहोचलो, आपण कोणाबद्दल बोलत आहोत याचा अंधारे यांनी विचार करावा असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय.मला सुषमा अंधारे यांच्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही. मला विकास करायचा आहे. मी मीरा भाईंदरचा विकास करणार आहे असं प्रताप सरनाईक  यांनी म्हटले आहे

संबंधित पोस्ट

भाजपा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करा : पटोले

vishwatmaklokswamivarta

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दुसरी यादी जाहीर… ज्येष्ठ नेते नाराज 

माजी आमदार दिवंगत अरुण जगताप याच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सांत्वन

भाजपा कडून विधान परिषदेसाठी उमेदवार यादी जाहीर; पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावांकुळे यांना पुन्हा तिकीट टाळलं!

vishwatmaklokswamivarta

शिंदे गटातील आमदार सुहास कांदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने; ‘माझं काय चुकलं’ म्हणत निवेदन देण्याच्या तयारीत….

vishwatmaklokswamivarta

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यामध्ये आमदार अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं अपात्र उमेदवारांच्या यादीत; सत्तारांनी आरोप फेटाळले….

vishwatmaklokswamivarta