vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

दिवाळीच्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, मुंबईकरांना संपाचा फटका

दिवाळीच्या दिवशी बेस्ट कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन, मुंबईकरांना संपाचा फटका…

मुंबईप्रतिनिधी

आज ऐन दिवाळीच्या दिवशी मरोळ बस आगारातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या मांडत आक्रमक झाले आहेत.

गेले तीन दिवसांपासून बेस्ट कर्मचाऱ्यांनी (BEST Employee Strike) संप पुकारला आहे. दिवाळीच्या (Diwali) मुहुर्तावर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने मुंबईकरांना वाहतुकीचा चांगलाचं फटका बसला आहे. तरी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून (BEST Contract Employees) हा संप पुकारण्यात आला आहे. 22 ऑक्टोबर पासून या संपास सुरुवात झाली असुन विविध आगारातील कर्मचारी आक्रमक झाल्याचं चित्र आहे. सांताक्रुज (Santa Cruz) आगारातील कर्मचाऱ्यांनी शनिवारी संप पुकारला होता तर काल जोगेश्वरी (Jogeshwari) आगारातली कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं होतं. आज तर ऐन दिवाळीच्या दिवशी मरोळ (Marol) बस आगारातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या मांडत

 

गेले वर्षी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Employee) एसटी महामंडळा विरुध्द संप पुकारला होता. पगारवाढीसह विविध मुद्द्यावरुन त्यांनी महामंडळा विरोधी आक्रमक झाले होते. पण यावर्षी मुंबईकरांची (Mumbai) जीवनवाहिनी बेस्टच्या (BEST Bus) कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईकरांना शहरातील प्रवासाला अडचण निर्माण होण्याचे चिन्ह आहे. तरी हा संप बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून  पुकारण्यात आला आहे

पगारवाढीसह दिवाळीचा बोनस (Diwali Bonus) अशा विविध मागण्यासह कंत्राटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत संप सुरुच राहणार असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तरी मुंबईतील विविध बेस्ट बस डेपो पैकी फक्त सांताक्रुजमधील शेकडो कंत्राटी कर्मचारी  संपावर गेल्याने पश्चिम मुंबई  भागातील नागरिकांना वाहतूकीचा फटका बसत आहे.

संबंधित पोस्ट

राज्याच्या संरक्षण उत्पादन धोरणामुळे देशाचे खरे ‘डिफेन्स क्लस्टर’ हे महाराष्ट्र आणि पुण्यात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निबे डिफेन्स ॲण्ड एरोस्पेस लि.च्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल, लघु शस्रास्त्र उत्पादन सुविधेचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

मराठा कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी व वाटपासाठी विशेष कक्ष स्थापन…

vishwatmaklokswamivarta

18-जालना लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्र परिसरात आवश्यक सुविधा व्यवस्थितपणे उपलब्ध कराव्यात– जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ  पार्किंग, सुरक्षा, पिण्याचे पाणी, स्वच्छता, वाहतूक,मिडिया कक्ष व मतमोजणी केंद्रातील अंतर्गत व्यवस्था चोख

आज एक एप्रिलपासून टॅक्स स्लॅबपासून वजावटपर्यंत बदलणार अनेक प्राप्तिकर नियम..

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना;ई-केवायसी व आधार सीडिंग बँक खात्यांशी संलग्न करा – कृषी विभागाचे आवाहन

सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय-मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता….