vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त मुंबईत बस, रेल्वे कडून विशेष सोय; पहा खास सोयी-सुविधा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त मुंबईत बस, रेल्वे कडून विशेष सोय; पहा खास सोयी-सुविधा….

मुंबई प्रतिनिधी

महापरिनिर्वाण दिना निमित्त गर्दी टाळण्यासाठी ट्रेन आणि बसची विशेष सोय असणार आहे. बेस्ट बस, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आपापल्या मार्गांवर विशेष बस, रेल्वे चालवणार आहेत.

डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या स्मरणार्थ 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिवस (Mahaparinirvan Diwas) म्हणून भीम अनुयायी पाळतात. देशा-परदेशातून या दिवशी दादरच्या चैत्यभूमीवर भीम अनुयायी बाबासाहेबांच्या स्मृतींना वंदन करायला येतात. यंदाही भीम अनुयायींची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. बेस्ट प्रशासन, रेल्वे प्रशासन यासाठी विशेष सेवा देखील चालवणार आहेत. गर्दी टाळण्यासाठी ट्रेन आणि बसची विशेष सोय असणार आहे. बेस्ट बस, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आपापल्या मार्गांवर विशेष बस, रेल्वे चालवणार आहेत.

मध्य रेल्वे द्वारे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 14 अनारक्षित विशेष गाड्यांची देखील घोषणा करण्यात आली आहे. नागपूर, कलबुर्गी, अजनी, सोलापूर येथून मुंबई मध्ये येण्यासाठी विशेष ट्रेन्स धावणार आहेत. मुंबई लोकल च्या देखील 12 विशेष लोकल गाड्या मुंबईत मध्य आणि हार्बर मार्गांवर धावणार आहेत. चैत्यभूमीवर विशेष सोय देखील असणार आहे.

दादर चौपाटी जवळ असणार्‍या चैत्यभूमीवर पोहचण्यासाठी दादर रेल्वे स्थानक ते शिवाजी पार्क आणि पुन्हा दादर रेल्वे स्थानक अशी बससेवा चालवली जाणार आहे. त्यासाठी सकाळी 7.30 ते रात्री 9.30 दरम्यान विशेष बस धावतील. 5 ते 7 डिसेंबर दरम्यान दादर ते ठाणे किंवा नवी मुंबईत प्रवास करणार्‍यांना बेस्ट कडून 50 रूपयांचा एसी बसचा डेली पास उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

संबंधित पोस्ट

दिव्यांग बांधव व अनाथ बालकांसह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी घेतले ‘श्रीं’चे दर्शन

vishwatmaklokswamivarta

आज 15 ऑक्टोबर पोलीस पाटील पदासाठी मुलाखतीचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

देशातील मोठी बातमी -एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

vishwatmaklokswamivarta

भ्रष्टाचार, गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठीनागरिक आणि संस्थेचीही नैतिक जबाबदारी- प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. ब्रह्मे

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगरात मानव – बिबटे संघर्ष रोखण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक उपाययोजना पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून दैनंदिन आढावा

vishwatmaklokswamivarta

छत्रपतींचे कधीच नाव घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला- राज ठाकरे अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना

vishwatmaklokswamivarta