vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पुण्यातून विशेष बातमी थकबाकी मिळाल्याने ठेकेदारांकडून PMPML चा संप मागे…

पुण्यातून विशेष बातमी थकबाकी मिळाल्याने ठेकेदारांकडून PMPML चा संप मागे…

पुणे प्रतिनिधी

पुणे महानगर परिवहन महामंडल लिमिटेड (पीएमपीएमएल)ला  बससेवा पुरवणाऱ्या चार ठेकेदारांनी गेल्या अनेक महिन्यांपासूनची थकबाकी न मिळाल्याने रविवारी अचानक संपाची  हाक दिली होती. यामुळे पुणेकरांचे  मोठे हाल झाले होते

पुणे महानगर परिवहन महामंडल लिमिटेड (पीएमपीएमएल)ला   बससेवा पुरवणाऱ्या चार ठेकेदारांनी गेल्या अनेक महिन्यांपासूनची थकबाकी न मिळाल्याने रविवारी अचानक संपाची  हाक दिली होती. यामुळे पुणेकरांचे (Pune) मोठे हाल झाले होते. सामान्य नागरिकांना सणाच्या दिवशी बससेवा बंद असल्याने नाहक मनस्ताप सहन करावा लागला होता. यानंतर सोमवारी रात्री बससेवा पुरवणाऱ्या 4 ठेकेदारांना  66 कोटी रुपयांची थकबाकी मिळाल्यानंतर बससेवा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी या बद्दलची माहिती दिली

गेल्या चार महिन्यांपासून ऑलेक्ट्रा, ट्रॅव्हल टाइम, अँथनी आणि हंसा या चार ठेकेदार कंपन्यांचे तब्बल 99 कोटी रुपयांचे बिल हे थकल्यामुळे त्यांनी संपाची हाक दिली होती. यानंतर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पीएमपीएमपीएल प्रशासनाला 90 कोटी रुपये दिले. यापैकी 66 कोटी रुपये ठेकेदारांना देण्यात आले तर 24 कोटी रुपये हे एमएनजीएलला देण्यात येणार आहे.

दरम्यान या संपाच्या वेळी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता त्यामुळे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख आणि संतोष नांगरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांची  भेट घेतली होती. या सर्वांनी बससेवा लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी केली होती. यांनतर बकोरिया यांनी थकबाकीची रक्कम अदा करत संप मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पीएमपीएलकडे सध्या 2142 बसेस आहेत. यापैकी 1100 बसेस या ठेकेदारांच्या असून 900 बसेस या पीएमपीएलच्या मालकीच्या आहेत.

 

संबंधित पोस्ट

जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र देहू देवस्थान समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जगदगुरू तुकाराम महाराज पुरस्कार’  

जळगाव तिला : स्टेट बँकेच्या दरोड्यात 17 लाखांच्या रोकडसह तीन कोटींचं सोनं लुटले, चोरट्यांनी CCTV कॅमेऱ्याचा DVR ही पळवला

जालना जिल्हा केबल सेना ऑपरेटर संघटनेच्या ‘समन्वयकपदी’ डॉ.रामकृष्णभोंडोने यांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

कोयना धरणात 101.47 टीएमसी पाणीसाठापाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कोयनेतून 95300 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग….

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पदके मिळवून दिव्यांगांनी देशाचे नावउज्वल केले -शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र पाटील

vishwatmaklokswamivarta

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा*१७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन तीसहून अधिक देशांमधील अभ्यासक, पर्यावरण तज्ज्ञ, आणि धोरणकर्त्यांचा समावेश* 

vishwatmaklokswamivarta