vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जळगाव तिला : स्टेट बँकेच्या दरोड्यात 17 लाखांच्या रोकडसह तीन कोटींचं सोनं लुटले, चोरट्यांनी CCTV कॅमेऱ्याचा DVR ही पळवला

जळगाव तिला : स्टेट बँकेच्या दरोड्यात 17 लाखांच्या रोकडसह तीन कोटींचं सोनं लुटले, चोरट्यांनी CCTV कॅमेऱ्याचा DVR ही पळवला.

[ जळगाव प्रतिनिधी: जळगाव स्टेट बँक ऑफ इंडियाच्या काल (1 जून) भरदिवसा दरोडा. हेल्मेटधारी दोन दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापकावर हल्ला करुन बँकेतील 17 लाख रुपयांची रोख रकमेसह तीन कोटी रुपयांचे सोनंही लुटून नेलं. इतकंच नाही तर बँकेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा (CCTV Camera) डीव्हीआर देखील चोरट्यांनी पळवला आहे. त्यामुळे आरोपींना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे.

तीन कोटींचं सोनं आणि 17 लाखांची रोकड लुटले

कालिका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत काल सकाळी बँक उघडताच दरोडा पडला. सकाळी दहा वाजता बँक उघडताच हेल्मेटधारी दोन तरुण बँकेत शिरले. त्यांनी कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवत आणि मॅनेजर राहुल महाजन यांच्यावर चाकूने वार करत त्यांना जखमी केलं. त्यानंतर त्यांच्याकडून लॉकरची चावी मिळवली. गोल्ड लोनसाठी बँकेतील लॉकरमध्ये असलेले तीन कोटी रुपयांचे सहा किलो सोने आणि 17 लाख रुपयांची रोकड लुटून नेली. या घटनेनंतर जळगावात एकच खळबळ उडाली आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर पळवला

यावेळी दरोडेखोरांनी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने बँकेवर दरोडा टाकला. आपली ओळख पटू नये यासाठी दरोडा टाकताना त्यांनी डोक्यात हेल्मेट घातलं होतं. तसंच बँकेत लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यास आणखी कोणती अडचण होऊ नये यासाठी डीव्हीआर देखील पळवून नेला आहे. त्यामुळे आरोपींना शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर उभं राहिलं आहे.

 

अवघ्या काही मिनिटांचा थरार

हा संपूर्ण प्रकार अवघ्या काही मिनिटांत घडला. चोरटे बँकेत घुसल्यापासून रोख रक्कम पळवून नेण्यापर्यंतची थरार अवघ्या काही मिनिटांचा होता. त्यांनी बँकेतील 17 लाखांपेक्षा जास्त रुपयांची रोकड लांबवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दरोडेखोरांना शोधण्याचं पोलिसांसमोर मोठं आव्हान

जळगाव शहरातील गेल्या अनेक दिवसातील हा सर्वात मोठ्या रकमेचा दरोडा असल्याचं कळतं. त्यामुळे याचं गांभीर्य ओळख या दरोड्यातील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पाच पथकं बनवली असून ती विविध ठिकाणी रवाना केली आहे. मात्र आरोपींची ओळख पटेल असा कोणताही पुरावा प्रथमदर्शनी तरी दिसत नसल्याने या दरोडेखोरांचा शोध घेण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे.

संबंधित पोस्ट

अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू..

महाबळेश्वर आणि पाचगणी या जगप्रसिद्ध थंड हवेच्या ठिकाणी स्ट्रोबेरीचे गाव अशी ओळख असलेल्या निसर्गाच्या अप्रतिम सौंदर्याने नटलेले… वाट पाहतंय आपली … भिलार गाव.. आपलं पुस्तकांचं गाव

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त*

आयआयटी संस्थांनी देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. 

कामात गती, पारदर्शकता ठेवत अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख होऊन काम करा – पालकमंत्री विखे पाटील-श्रीगोंद्यात ‘बिबट रेस्क्यू सेंटर’ व वनविभागाच्या जागेवर विकास प्रकल्प उभारण्याच्या सूचना..

vishwatmaklokswamivarta

३० खाटांच्या रुग्णालयांना जन आरोग्य योजनेत समावेश करता येणार १० खाटांच्या एकल विशेषता रुग्णालयांनाही संधी पॅनलवर समावेशासाठी रुग्णालयांनी ऑनलाइन अर्ज करावा जिल्हा शल्यचिकीस्तक डॉ दत्तात्रय बिरासदार यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta