vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत दापोडे येथे केमिकलच्या ड्रमने भरलेल्या ट्रकला भीषण आग…

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत दापोडे येथे केमिकलच्या ड्रमने भरलेल्या ट्रकला भीषण आग…

 

पंडित प्रतिनिधी

भिवंडीत  दापोडे  येथे केमिकलच्या ड्रम ने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

भिवंडीत  दापोडे  येथे केमिकलच्या ड्रम ने भरलेल्या ट्रकला भीषण आग  लागल्याची घटना घडली. या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. ट्रकला आग लागल्याचे समजताचं चालकाने ट्रकमधून उडी मारली. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला

माहितीनुसार, या ट्रकमध्ये केमिकलचे ड्रम होते. आग लावल्याने ट्रकमधील केमिकलच्या ड्रमनेही पेट घेतला. त्यानंतर एकामागून एक स्फोट होऊ लागले. स्फोट झाल्याने हे ड्रम ट्रकच्या बाहेर पडत होते. यातील एक ड्रम रस्त्यावरील चायनीजच्या दुकानावर पडला. परिणामी, या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे

दापोडे परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत या घटनेची माहिती नारपोली पोलिसांना दिली. यानंतर नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावून घेतलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक परिश्रमातून ट्रकला लागलेली आग विझवण्यात यश आलं.

संबंधित पोस्ट

मास्टर सभेनंतर मुख्यमंत्र्यांच्या राज्यभरात सभा, शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू…

आम्ही दहशतवाद्यांचा धर्म विचरला नाही, आम्ही दहशतवादाला लक्ष्य केले, नागरिकांना नाही आणि लष्करी तळांना ही नाही : संरक्षण मंत्री राजनाथ सिंग

बहूविद्याशाखीय अभ्यासक्रमांना जोडून ‘इंटर्नशीप’कार्यक्रमासाठी क्रिस्प व एनएसडीसी संस्था आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागात सामंजस्य करार

प्रत्येक बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करावे- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश,महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवावी

vishwatmaklokswamivarta

पहलगाम दहशतवादी हल्ला-राज्यातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांची मदत वितरीत..

अजिंठा महोत्सव यंदा दि.२, ३ व ४ फेब्रुवारी रोजी सोनेरी महाल,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर येथे होणार…

vishwatmaklokswamivarta