vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत दापोडे येथे केमिकलच्या ड्रमने भरलेल्या ट्रकला भीषण आग…

ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत दापोडे येथे केमिकलच्या ड्रमने भरलेल्या ट्रकला भीषण आग…

 

पंडित प्रतिनिधी

भिवंडीत  दापोडे  येथे केमिकलच्या ड्रम ने भरलेल्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

भिवंडीत  दापोडे  येथे केमिकलच्या ड्रम ने भरलेल्या ट्रकला भीषण आग  लागल्याची घटना घडली. या घटनेत ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताचं अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळ गाठले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. ट्रकला आग लागल्याचे समजताचं चालकाने ट्रकमधून उडी मारली. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला

माहितीनुसार, या ट्रकमध्ये केमिकलचे ड्रम होते. आग लावल्याने ट्रकमधील केमिकलच्या ड्रमनेही पेट घेतला. त्यानंतर एकामागून एक स्फोट होऊ लागले. स्फोट झाल्याने हे ड्रम ट्रकच्या बाहेर पडत होते. यातील एक ड्रम रस्त्यावरील चायनीजच्या दुकानावर पडला. परिणामी, या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे

दापोडे परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत या घटनेची माहिती नारपोली पोलिसांना दिली. यानंतर नारपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ अग्निशमन दलाला घटनास्थळी बोलावून घेतलं. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक परिश्रमातून ट्रकला लागलेली आग विझवण्यात यश आलं.

संबंधित पोस्ट

मुंबई शहर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघांसाठी सर्वसाधारण, पोलीस आणि खर्च निवडणूक निरीक्षक नियुक्त नागरिकांना विशिष्ट वेळेत भेटता येणार

vishwatmaklokswamivarta

१५ ऑगस्ट देशभक्तीपर गीतांनी साजरा करा – शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे*स्वतंत्र दिनाच्या पार्श्वभूमीवर शाळांना विविध उपक्रम आयोजनाच्या सूचना  • जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठक तहकूब

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट शहरात,किणी रोड येथील स्मशानभूमी नष्ट करून त्या जागेत बगिचा करत असल्याने त्याचा निषेधार्थ, बगिचा हटवा समितीच्या वतीने नगरपरिषदे समोर आमरण उपोषण सुरू.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारचा पुढाकार : ‘आदिशक्ती अभियान’ आणि ‘आदिशक्ती पुरस्कार’ यांना मंत्रिमंडळाची मंजुरी

ठाणे जिल्ह्यातील  श्री मलंगगड येथे माघी पौर्णिमेनिमित्त  श्री मलंगगड उत्सवाला उपस्थित राहून श्रीमलंग मच्छिंद्रनाथांचे भक्तीभावाने दर्शन घेऊन मनोभावे महाआरती. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आले

vishwatmaklokswamivarta

आज सोमवार: कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ! 1 लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजाल? 

vishwatmaklokswamivarta