vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

चीनमध्ये मोठी दुर्घटना; रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू…

चीनमध्ये मोठी दुर्घटना; रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 21 जणांचा होरपळून मृत्यू…

 

विदेश प्रतिनिधी

चीनची राजधानी असलेल्या बीजिंगमधील एका रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 71 जणांना वाचवण्यात यश आले आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगमधील चांगफेंग हॉस्पिटलमध्ये हा अपघात झाला.

रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी 21 लोकांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून, घटनेचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगच्या फेंगताई जिल्ह्यातील एका रुग्णालयाच्या इमारतीला दुपारी 12:57 वाजता आग लागली.

त्याचवेळी चीनमध्ये आग लागण्याची आणखी एक घटना समोर आली आहे. पूर्वेकडील झेजियांग प्रांतातील जिन्हुआ शहरातील वुई काउंटीमधील कारखान्याला लागलेल्या आगीमध्ये अकरा जणांचा मृत्यू झाला. स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:04 वाजता ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस अधिकारी आणि आपत्कालीन वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

संबंधित पोस्ट

चीनमध्ये कोरोना बाधित लोखंडी बॉक्सेसमध्ये क्वारंटाईन, कोट्यवधी नागरिक घरात कैदेत, झिरो कोविड धोरणामुळं ..?

vishwatmaklokswamivarta

नेपाळच्या नाईट क्लबमध्ये पार्टी करताना दिसले राहुल गांधी; व्हिडिओ शेअर करत भाजपने साधला निशाणा

पाकिस्तानात पाऊस आणि पुरामुळे हाहाकार, जवळजवळ 1000 जणांचा मृत्यू; देशात आणीबाणी जाहीर

अफगाणिस्तानच्या हिंदुकुश पर्वतरांगेत नुकत्याच झालेल्या ६.० किंवा ६.३ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे अनेक घरे कोसळली असून, या भूकंपाच्या धक्क्यांमुळे किमान ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अंदाजे २५०० हून अधिक लोक जखमी

vishwatmaklokswamivarta

धक्कादायक, डॉक्टर आणि रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे 19 बालके दगावली, काही महिलांचा मृत्यू.

सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनच्या अध्यक्षांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट..