vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

चक्रीवादळ गुजरातला धडकलं, वाऱ्यांचा वेग ताशी १२५ किमी, सौराष्ट्र आणि कच्छला तडाखा…

चक्रीवादळ गुजरातला धडकलं, वाऱ्यांचा वेग ताशी १२५ किमी, सौराष्ट्र आणि कच्छला तडाखा…

 

प्रतिनिधी गुजरात

अतितीव्र ‘बिपर्जय’ चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानातील कराचीच्या दरम्यान जखाऊ बंदराजवळ किनारपट्टीला धडकले. चक्रीवादळाच्या लँडफॉलची (जमिनीवरील प्रवेश) संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान सुरू झालेली प्रक्रिया रात्री साडेअकरापर्यंत सुरू होती. प्राथमिक माहितीनुसार वादळाच्या तडाख्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ठिकठिकाणी झाडे, विजेचे खांब पडण्याच्या घटना घडल्या असून, वादळाचा जोर ओसरताच मदतकार्याला सुरुवात होणार आहे. रात्री उशिरापर्यंत जीवितहानीची नोंद झाली नाही

अरबी समुद्रावर घोंघावणारे ‘बिपर्जय’ चक्रीवादळ ताशी १२ किमी वेगाने गुरुवारी संध्याकाळी भारत-पाक सीमेजवळ गुजरात किनारपट्टीला धडकले. या वेळी वादळाच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी ११५ ते १२५ किलोमीटर इतका नोंदला गेल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली. गुरुवारी सकाळपासूनच सौराष्ट्र आणि कच्छ क्षेत्रामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली.

 

जखाऊ बंदरासह नारायण सरोवर, नलिया, मांडवी, द्वारका, पोरबंदर, जामनगर, मोरबी आदी ठिकाणांना वादळाचा थेट तडाखा बसला. किनारपट्टीवरील सखल भागांमध्ये वादळाशी संलग्न दोन ते तीन मीटर उंचीच्या समुद्राच्या लाटांचे पाणी शिरले असल्याची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली.

चक्रीवादळाची आपत्ती लक्षात घेऊन एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या एकूण ४० तुकड्या, तसेच नौदलाच्या २५ तुकड्या बचाव कार्य आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गुरुवारी संध्याकाळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी प्रशासनाला मदतकर्यासंबंधी सूचना दिल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे परिस्थितीचा आढावा घेतला.

संबंधित पोस्ट

आंबा महोत्सवात 40 आंब्याच्या प्रजातींचे प्रदर्शन*नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा सतर्क· बालविवाहाची माहिती देण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 किंवा 112 डायल करा

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागातील जिल्ह्यांना अलर्ट मोडवर राहण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश* *मनुष्य व पशुहानी टाळण्यास द्यावे सर्वोच्च प्राधान्य- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे*

vishwatmaklokswamivarta

मध्यप्रदेश येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरीयल सोसायटी महूच्या वतीने जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील प्राध्यापक डॉ.जलबा नरवडे यांना मुख्यमंत्री डॉ.मोहन यादव यांच्या हस्ते भीम रत्न पुरस्कार…

पृथ्वीच्या रक्षणासाठी बांबू शेती उपयुक्त- राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलØ जागतिक बांबू दिनी चर्चासत्राचे आयोजन, चर्चासत्राला पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र वापरण्यास मनाई