vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

चक्रीवादळ गुजरातला धडकलं, वाऱ्यांचा वेग ताशी १२५ किमी, सौराष्ट्र आणि कच्छला तडाखा…

चक्रीवादळ गुजरातला धडकलं, वाऱ्यांचा वेग ताशी १२५ किमी, सौराष्ट्र आणि कच्छला तडाखा…

 

प्रतिनिधी गुजरात

अतितीव्र ‘बिपर्जय’ चक्रीवादळ गुरुवारी संध्याकाळी गुजरातमधील मांडवी आणि पाकिस्तानातील कराचीच्या दरम्यान जखाऊ बंदराजवळ किनारपट्टीला धडकले. चक्रीवादळाच्या लँडफॉलची (जमिनीवरील प्रवेश) संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान सुरू झालेली प्रक्रिया रात्री साडेअकरापर्यंत सुरू होती. प्राथमिक माहितीनुसार वादळाच्या तडाख्यामुळे सौराष्ट्र आणि कच्छमध्ये ठिकठिकाणी झाडे, विजेचे खांब पडण्याच्या घटना घडल्या असून, वादळाचा जोर ओसरताच मदतकार्याला सुरुवात होणार आहे. रात्री उशिरापर्यंत जीवितहानीची नोंद झाली नाही

अरबी समुद्रावर घोंघावणारे ‘बिपर्जय’ चक्रीवादळ ताशी १२ किमी वेगाने गुरुवारी संध्याकाळी भारत-पाक सीमेजवळ गुजरात किनारपट्टीला धडकले. या वेळी वादळाच्या केंद्राभोवती फिरणाऱ्या वाऱ्यांचा वेग ताशी ११५ ते १२५ किलोमीटर इतका नोंदला गेल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली. गुरुवारी सकाळपासूनच सौराष्ट्र आणि कच्छ क्षेत्रामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली.

 

जखाऊ बंदरासह नारायण सरोवर, नलिया, मांडवी, द्वारका, पोरबंदर, जामनगर, मोरबी आदी ठिकाणांना वादळाचा थेट तडाखा बसला. किनारपट्टीवरील सखल भागांमध्ये वादळाशी संलग्न दोन ते तीन मीटर उंचीच्या समुद्राच्या लाटांचे पाणी शिरले असल्याची शक्यता ‘आयएमडी’ने वर्तवली.

चक्रीवादळाची आपत्ती लक्षात घेऊन एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या एकूण ४० तुकड्या, तसेच नौदलाच्या २५ तुकड्या बचाव कार्य आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गुरुवारी संध्याकाळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी प्रशासनाला मदतकर्यासंबंधी सूचना दिल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे परिस्थितीचा आढावा घेतला.

संबंधित पोस्ट

मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी जालना जिल्ह्यातील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे निषेधार्थ तिसऱ्या दिवशीही मराठवाड्यासह राज्यात विविध ठिकठिकाणी संतप्त पडसाद उमटणे सुरूच…

vishwatmaklokswamivarta

मुंबईला पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सात तलावांमध्ये 3 महिने टिकेल एवढा पाणीपुरवठा

देशात २४ तासात १ लाख ९४ हजार नवे रुग्ण; ४४0 जणांचा मृत्यू…

vishwatmaklokswamivarta

तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी समाज कल्याण कार्यालयात हेल्पलाईन कक्ष सुरू

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या २० जिल्हयांमधल्या १२२ जागांसाठी मतदान

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना हिमाचल प्रदेशमध्ये खासगी हॉटेलमध्ये वास्तव्य करावं लागणार आहे. चार दिवसांच्या दौऱ्यावर

vishwatmaklokswamivarta