vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र राज्यात राजकीय भूकंपानंतर आज ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांच्या वेगवेगळ्या बैठका…

महाराष्ट्र राज्यात राजकीय भूकंपानंतर आज ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांच्या वेगवेगळ्या बैठका…

 

राज्य प्रतिनिधी

शिवसेना पक्षापाठोपाठ आता शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही बंडखोरी झाली. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस महत्त्वाचा ठरत आहे. आज राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे.

आता शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही बंडखोरी झाली. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले. या पार्श्वभूमीवर आजचा दिवस महत्त्वाचा ठरत आहे. आज राजकीय पक्षांनी बैठकांचा धडाका लावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना (UBT) पक्षाची तर बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या विविध नेत्यांची अशा दोन वेगवेगळ्या बैठका पार पडत आहेत. या बैठकांमध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा होते याबाबत उत्सुकता आहे.

उद्धव ठाकरे गटाची बैठक शिवसेना भवन येथे आज दुपारी 12.30 वाजता पार पडत आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे गटाचे आमदार, खासदार आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी आगामी निवडणुका महाविकासआघाडीतच  लढायच्या की, आपला एकला चलोरेचा मार्ग अनुसरायचा यावर विचार होण्याची शक्यता आहे. बैठक झाल्यावर उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. या पत्रकार परिषदेतच उद्धव ठाकरे आपली भूमिका व्यक्त करतील असे समजते

अजित पवार यांच्या शपथ विधीनंतर राज्यात राजकीय वातावरण तापले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थकांमध्ये अजित पवार यांच्या शपथविधीने जोरदार अस्वस्थता पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्यामुळे सत्तासमिकरणे बिघडली आहेत. शिंदे गटाचे महत्त्व कमी झाले आहे, असे अनेकांना वाटते. त्यामुळे या बैठकीत अनेकांनी आपली भावना एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविल्याचे समजते.

संबंधित पोस्ट

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देशातच..? गृहविभागाला मात्र ठावठिकाणी नाही

vishwatmaklokswamivarta

हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचे अनावरण,स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे कार्य राज्याला दिशादर्शक- मुख्यमंत्री फडणवीस

vishwatmaklokswamivarta

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर 

विधानपरिषद लक्षवेधी :सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व्यवहारांतील दोषींवर कारवाई- सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

नववर्षाच्या सुरुवातीला,पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 10 व्या हप्त्याची प्रतिक्षा, देशभरातील 11 कोटीहून  शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार 

vishwatmaklokswamivarta

सर्वसामान्यांना हक्काचे घर देण्यासाठीराज्य शासन प्रयत्नशील- मंत्री अतुल सावे