vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत**समृद्धी महामार्गावर बांधकामाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक..

शहापूर दुर्घटनेमधील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत**समृद्धी महामार्गावर बांधकामाच्या वेळी झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक..

 

मुंबई प्रतिनिधी

जनसंपर्क कक्ष : शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जण मरण पावले असून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

 

आज मुख्यमंत्री पंतप्रधानांच्या कार्यक्रमानिमित्त पुणे येथे असून अपघाताचे वृत्त समजताच त्यांनी जिल्हा प्रशासन तसेच संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून दुर्घटनेविषयी जाणून घेतले. हा अपघात अतिशय दुर्दैवी असून त्याची सखोल चौकशी करण्यासही त्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्याशी बोलून त्यांना तातडीने दुर्घटनास्थळी रवानाही केले. एन डी आर एफ चे पथक याठिकाणी पोहचले असून योग्य रीतीने बचाव कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा असल्याने अधिक खबरदारी घेण्यासही त्यांनी सांगितले आहे. समृध्दी महामार्गाचे तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू असताना हा अपघात घडला.

 

संबंधित पोस्ट

सर्वसामान्यांचे गृहस्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता;  सर्व बांधकाम व्यावसायिकांना ” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

लिंबूवर्गीय फळपिकांसाठीच्या तीन सिट्रस इस्टेटसाठी7 कोटींचा निधी…

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणार प्रधानमंत्री पीक विमा योजना सन 2025

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025**सभापती आरक्षण सोडतीसाठी*विशेष सभा आयोजित*

उमेदवारांना 9 नोव्हेंबरला मुलाखतीस हजर राहण्याचे आवाहन,भारतीय सशस्त्र सैन्य दलामध्ये अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी .

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेसाठीअडवणूक, दिरंगाई, पैशांची मागणी केल्यास कठोर कारवाई मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना योजनेच्या पारदर्शक, गतिमान अंमलबजावणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात नोडल अधिकारी• जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवावे• दलाल अजिबात खपवून घेतले जाणार नाहीत