vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागासाठी,5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..

गणेशोत्सव मंडळांनी स्पर्धेत सहभागासाठी,5 सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन..

 

मुंबई, प्रतिनिधी

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक गणेशमंडळांनी 5 सप्टेंबर 2023 पूर्वी mahotsav.plda@gmail.com या ईमेलवर अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

 

गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याकरिता स्पर्धा आयोजन करून अभिप्रायासह गुणांकन करून प्रस्तावास शासनास सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती मंडळाच्या उत्सवस्थळी प्रत्यक्ष भेट देणार आहे. समितीकडून प्रत्येक गणेशोत्सव मंडळाबाबत अभिप्रायासह गुणांकन करून तीन गणेशोत्सव मंडळाची शिफारस करून त्यांची नावे सर्व कागदपत्र व्हीडिओसह राज्य समितीकडे देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत प्रकल्प संचालक, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्याकडे 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत सादर करावेत.

 

निकालासंदर्भात स्वतंत्र सूचना देण्यात येतील. जास्तीत जास्त मंडळांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

उत्तर प्रदेशातील बांदा येथे बोटीचा मोठा अपघात, यमुना नदीत बुडाले 30 जण; दोघांचे मृतदेह सापडले…

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, प्रक्रीया उद्यापासून सुरू

vishwatmaklokswamivarta

21 ऑगस्टला एजिस फेडरल लाइफ इन्शुरन्स मुंबई हाफ मॅरेथॉन पार पडणार, सचिन तेंडुलकर दाखवणार झेंडा

संजय राऊतांना जामीन मिळणार? पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आज कोर्टात सुनावणी

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात माध्यमांना बंदी…

वर्ष अखेरीस पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

vishwatmaklokswamivarta