vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सोयाबीनवरील रोगाच्या प्रादुर्भावाचे तातडीने पंचनामे करावेतविमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी, मदत व पुनर्वसनला निर्देश..

सोयाबीनवरील रोगाच्या प्रादुर्भावाचे तातडीने पंचनामे करावेतविमा मिळण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कृषी, मदत व पुनर्वसनला निर्देश..

राज्य प्रतिनिधी

            राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक (येलो मोझॅक) हा विषाणूजन्य रोग आणि खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला असून कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीत दिले.

 

पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, तापमानात बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषत: चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशीम, नांदेड या जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत चालले आहे.

 

नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने हे पंचनामे करावेत, असे निर्देश देण्यात आले.

 

00000

संबंधित पोस्ट

नांदेड शहरात जड वाहनांना #प्रवेशबंदी   

विधानपरिषद लक्षवेधी सूचना :चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीतील स्फोट प्रकरणी दुर्घटनाग्रस्तांना आर्थिक सहाय्य प्राप्त- कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

ठाकरे बंधूची युती सत्ता , स्वार्थ आणि अस्तित्वासाठी असून कोणाच्याही युती किंवा आघाडी झाल्या तरी महायुती भक्कम आहे – शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे.

vishwatmaklokswamivarta

गुढीपाडवा मोठ्या उत्साह सगळीकडे दोन वर्षांनंतर धुमधडाक्यात नववर्षाचं स्वागत, सर्वत्र आनंदाचं वातावरण…

बकरी ईद – जनावरांच्या कत्तलीसाठी प्रतिबंधित बाबी   येत्या 7 जूनला बकरी ईद सण आहे. बकरी ईद सणासाठी जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल, कुर्बानी करण्यात येत असते. या अनुषंगाने प्रतिबंधित बाबींची माहिती देणारा लेख…

राज्यात पुढील चार दिवसांत समाधानकारक पर्जन्यमानाची शक्यता…