vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी,पूर्वप्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी,पूर्वप्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन

 

             सांगली, प्रतिनिधी : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी.) परीक्षेची पूर्वतयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतींसाठी दिनांक 20 ते 29 नोव्हेंबर 2023 या कालावधीत एसएसबी कोर्स क्र. 55 आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थीना निःशुल्क प्रशिक्षण, निवास व भोजन दिले जाते. सांगली जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्यदलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सांगली येथे दिनांक 13 नोव्हेंबर 2023 रोजी मुलाखतीस हजर रहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.

 

उमेदवारांनी मुलाखतीस येतेवेळी त्यांनी Department of Sainik Welfare, Pune (DSW) यांच्या वेबसाईटवर सर्च करुन त्यामधील SSB-५५ कोर्ससाठी (किंवा संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने प्रिंट दिलेल्या) प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पुर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

 

एस. एस. बी. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी पुढील नमूद कोणतीही एक पात्रता असणे आवश्यक आहे व त्यासंबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येताना सोबत घेवून यावेत. (१) कम्बाईंड डिफेन्स सव्हीसेस एक्झामिनेशन (CDSE-UPSC) अथवा नॅशनल डिफेंस अॅकेडमी एक्झामिनेशन (NDA-UPSC) पास झालेली असावी व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे.(२) एनसीसी ‘C’ सर्टिफिकेट ‘A’ किंवा ‘B’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत व एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने एस. एस. बी. साठी शिफारस केलेली असावी. (३) टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. विद्यापीठ प्रवेश प्रणालीसाठी एस. एस. बी. कॉल लेटर असावे किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.

 

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्र पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक यांचा ईमेल आय डी training.pctcnashik@gmail.com व दूरध्वनी क्र. ०२३३-२९९०७१२ आणि 0253-2451032 किंवा व्हॉटसॲप क्र. 9156073306 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दूरध्वनीवर संपर्क करावा, असे आवाहन डॉ. चवदार यांनी केले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

स्व. गोपीनाथराव मुंडे साहेब यांना भाजपा जालना महानगर तर्फे विनम्र अभिवादन-स्व.गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे कार्य सदैव मार्गदर्शक ठरेल – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे 

मुंबईच्या कायापालटासाठी खड्डे आणि झोपडपट्टीमुक्ती आवश्यक: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

अकरावीसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश नोंदणी सुरु:वेळापत्रकानुसार नोंदणी करण्याचे आवाहन

राज्यासाठी २४ तास धोक्याचे, ठाण्यासह १९ जिल्ह्यांना हवामान विभाग कडून पावसाचा अलर्ट जारी..

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान,औषधी व सुगंधी वनस्पती लागवडीसाठी 50 हजार ते 1.50 लाखांपर्यंत अनुदान33.50 लाख रुपयांच्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी ;महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करा- मनोजकुमार ढगे यांचे आवाहन

नागरिकांना सकस व निर्भेळ प्रतीचे.अन्न उपलब्ध करून देण्यास प्राधान्य अन्न व औषध प्रशासन विभागाचे सचिव धीरज कुमार· “सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा अभियान” शुभारंभ सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाचे विशेष तपासणी अभियान…

vishwatmaklokswamivarta