vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात बेरोजगारांसाठी आज प्लेसमेंट ड्राईव्ह..

 महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात बेरोजगारांसाठी आज प्लेसमेंट ड्राईव्ह..

 

        सांगली, प्रतिनिधी : खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठे उद्योजक, कारखाने व हॉस्पीटल यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी व समाजात दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सांगली कार्यालयामार्फत जिल्हास्तरीय प्लेसमेट ड्राईव्हचे आयोजन गुरूवार, 26 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अर्ज करावा. मुलाखतीसाठी 26 ऑक्टोबर रोजी कार्यालयात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी केले आहे.

 

प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये एकूण 7 विविध खाजगी नामवंत कंपन्या व हॉस्पीटल सहभागी होणार असून त्यामध्ये प्रामुख्याने हिंदुस्थान नायलॉन मिरज, श्री. सिध्दीविनायक गणपती कॅन्सर हॉस्पीटल मिरज, विरेशा कास्टींग प्रा. लि. कुपवाड, महाबळ मेटल प्रा. लि. मिरज, नेहा इंजिटेक सोल्युशन प्रा. लि. कुपवाड, उष:काल अभीनव हॉस्पीटल सांगली व बालाजी ॲटो सर्व्हीसेस कुपवाड इत्यादी कंपन्या व हॉस्पीटल भाग घेणार असून त्यांच्याकडील एकूण 165 जागा भरण्यात येणार असल्याचे श्री. करीम यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पास मान्यता; नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा

बोरघाट महामार्गावर जड-अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना

जागतिक कौशल्य स्पर्धेच्या राज्यस्तरीय फेरीत अमरावतीची बाजी,विजेत्यांच्या जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते सत्कार चार विजेत्यांनी उंचावला जिल्ह्याचा नावलौकिक…

vishwatmaklokswamivarta

शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या97 प्रकल्पग्रस्तांपैकी 43 प्रकल्पग्रस्तांना झाले भूखंडाचे वाटप,उर्वरित प्रकल्पग्रस्तांनी वारस नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रेजिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मतदान करत नाही…. असला दादला नको गं बाई’विद्यार्थ्यांनी केली भारुडातून जनजागृती योग्य प्रतिनिधीत्वासाठी मतदानाचा टक्का वाढणे,आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

रायगड जिल्ह्यातील 🌧️ हेटवणे धरण विसर्ग सुरू – नागरिकांना सतर्कतेचा इशारा! . प्रशासनाने नदीकाठच्या राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना दिल्या आहेत.

vishwatmaklokswamivarta