vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बोरघाट महामार्गावर जड-अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना

बोरघाट महामार्गावर जड-अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी

जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना

रायगड( प्रतिनिधी:- मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 48) बोरघाट या महामार्गावर जड-अवजड वाहतुकीमुळे वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उपाययोजना म्हणून या अधिसूचनेच्या दिनांकापासून ते पुढील आदेश होईपर्यंत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 48) बोरघाट या महामार्गावर  सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतूकीसाठी पूर्णत: बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.

सदर कालावधीकरीता रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतूकीकरीता बंद करण्याबाबत पोलीस अधीक्षक रायगड यांच्या पत्राच्या अनुषंगाने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग (क्रमांक 48) बोरघाट हा तीव्र चढउताराचा वाळणाचा रस्ता असल्याने या महामार्गावरील यापुर्वी घडलेल्या अपघातांच्या घटनांमुळे तसेच सद्यस्थितीत वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून उपाययोजना व जनतेच्या सुरक्षिततेसाठी या महामार्गावरुन जड-अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करणे आवश्यक असल्याबाबत जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे.

०००००००००

संबंधित पोस्ट

आधुनिक तंत्रज्ञानामुळे भात शेती अधिक किफायतशीर व उत्पादनक्षम होणारतुळशी येथे खरीपपूर्व भात लागवड प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

थकीत कर्जाचा एक रकमी भरणा केल्यास व्याजात मिळणार 50 टक्के सवलत

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राची वित्तीय शिस्त आणि आर्थिक विकासातील योगदान कौतुकास्पद-सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. अरविंद पनगढिया• सोळाव्या वित्त आयोगाची बैठक• राज्याने आर्थिक वाटपासाठी मांडल्या महत्त्वाच्या मागण्या..

दिव्यांग कन्येच्या हस्ते मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २१ हजारांची मदत !

पत्रकारीता आणि प्रशासन समाजरथाची दोन चाके-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी