
श्री धाविर महाराजांचा पालखी सोहळा!,रायगड पोलिसांनी दिली सशस्त्र मानवंदना पालकमंत्री उदय सामंत आणि महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची उपस्थिती..
रायगड प्रतिनिधी- जिल्ह्याचे श्रध्दास्थान आणि रोहयाचे ग्रामदैवत श्री धाविर महाराजांच्या पालखी सोहळ्यास बुधवारी पहाटे मोठया उत्साहात सुरूवात झाली. उद्योग मंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी विधिवत पूजा केली.
यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खा.सुनिल तटकरे, आम.अनिकेत तटकरे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
रायगड पोलिसांच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर व पथकाने श्री धाविर महाराजांना सशस्त्र मानवंदना दिली. भल्या पहाटे मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या वाद्याने ग्रामदैवताची महाआरती संपन्न झाली. पोलिसांनी मानवंदना दिल्यानंतर महाराजांची पालखी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मार्गस्थ झाली. या सोहळ्यास लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



