
आंध्र प्रदेश रेल्वे दुर्घटना, मृतांची संख्या डझनाहून अधिक, 13 पैकी 7 जणांची ओळख पटल्या असल्याची माहिती
राज्य प्रतिनिधी
आंध्र प्रदेशातील विझियानगरम जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या आता वाढू लागी आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत ही संख्या 13 इतकी झाली असून त्यातील 7 मृतदेहांची ओळख पटली आहे
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार आतापर्यंत ही संख्या 13 इतकी झाली असून त्यातील 7 मृतदेहांची ओळख पटली आहे. इतर मृतदेहांची ओळख पठविण्याचे काम सुरु आहे. या शिवाय अजूनही बचाव आणि मदत सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विशाखापट्टणम-रगडा पॅसेंजर ट्रेनची त्याच मार्गावरील विशाखापट्टणम-रगडा ट्रेनला धडक बसल्याने अपघाताची ही घटना 29 ऑक्टोबर रोजी घडली. ट्रेन एकमेकांना धडकताच दोन्ही बाजूचे अनेक डबे रुळावरुन घसरले. ज्यामुळे जीवितहानी झाली. अनेक जखमी झाले. ट्रेनचेही मोठे नुकसान झाले.
ईस्ट कोस्ट रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) विश्वजित साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात 11 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर अंदाजे 50 लोक जखमी झाले आहेत. एएनआच्या वृत्तात मात्र मृतांची संख्या 13 सांगण्यात आली आहे. बचाव कार्य पूर्ण झाले आहे, आता ट्रॅक पुनर्संचयित करण्यावर लक्ष केंद्रित आहे. अडकलेल्या प्रवाशांसाठी बसेस आणि गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून अनेक रेल्वे सेवा रद्द किंवा वळवण्यात आल्या आहेत, असेही साहू म्हणाले.
: ईस्ट कोस्ट रेल्वे (ECoR) सूचित करते की मानवी चुकांमुळे विझियानगरम जिल्ह्यात दोन ट्रेनची टक्कर झाली असण्याची शक्यता आहे. ईसीओआर सीपीआरओ बिस्वजित साहू यांनी सांगितले की, विशाखापट्टणम-रायगडा पॅसेंजर ट्रेनने सिग्नल ओव्हरशॉट केला असावा, परिणामी टक्कर झाली. दरम्यान, घटनेची चौकशी सुरु आहे. लवकरच निश्चित कारण पुढे येईल, असे त्यांनी सांगितले.



