vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

 

 

 

        सांगली, प्रतिनिधी : माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोंबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाकडील परिपत्रकान्वये दिलेल्या सुचनांनुसार जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

 

या कार्यक्रमामध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी व अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख-पाटील यांनी सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी स्व. डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आत्मचरित्राबाबत भाषण केले. मराठी भाषा अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 9 विजया पांगारकर यांनी मराठी भाषा व जीवनात वाचनाच्या महत्वाबद्दल सांगितले. तसेच अधिकारी व कर्मचारी यांनी स्वयंरचित काव्यवाचन केले व पूर्णपणे मराठी भाषेत अचानक दिलेल्या विषयावर १ मिनिटे मतप्रदर्शन करण्याबाबत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी, तहसिलदार व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

 

0000

संबंधित पोस्ट

पिकविम्याच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा – आ. कैलास गोरंटयाल -शिष्ट मंडळासह जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

अमृत दुर्गोत्सव २०२५’ला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचा बहुमान ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रमाणपत्र केले सुपुर्द· महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी संस्थेच्या कार्याची जागतिक स्तरावर दखल…

vishwatmaklokswamivarta

चिचडोह बॅरेजचे दरवाजे उघडणार ; नागरिकांनी सतर्कता बाळगावी – प्रशासनाचे आवाहन

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केली संभाव्य पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने स्थळ पाहणी…

गर्भलिंगनिदान चाचणीची खबर देणाऱ्यास पारितोषिक नागरिकांनी माहिती द्यावी- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे 16 वर्षाखालील क्रिकेट खेळाडुंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी..