vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मातंग व तत्सम पोटजातीतील नावावर शेतजमीन असणाऱ्या व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन.

मातंग व तत्सम पोटजातीतील नावावर शेतजमीन असणाऱ्या व्यक्तींना अर्ज करण्याचे आवाहन.

 

 

 

राज्य प्रतिनिधी:- जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीतील ज्या व्यक्तींच्या नावे शेतजमीन आहे. अशा व्यक्तींनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या जालना जिल्हा कार्यालयात गुरुवार दि.30 नोव्हेंबर 2023 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक व्ही. एस. सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम 12 पोट जातीमधील शेतजमीन असणाऱ्या व्यक्तींनी दि.30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.15 या कार्यालयीन वेळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे अर्जदाराने स्वत: उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावे. अर्जासोबत शेतीचा सातबारा, जातीचा दाखला, आधारकार्ड, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र जोडावे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र.02482 224902 यावर संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रात 29 जानेवारीनंतर येणार थंडीची लाट; तापमानात नोंदवली जाईल लक्षणीय घट

vishwatmaklokswamivarta

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिर 2025 चे आयोजन

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान जगातील सर्वात मोठे कुलूप किल्ली आणि लाडू प्रसादाचे अयोध्येत आगमन

vishwatmaklokswamivarta

अकोल्याचे ३० बालवैज्ञानिक विद्यार्थी निघाले इस्त्रो वारीला जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दाखवली हिरवी झेंडी..

vishwatmaklokswamivarta

दुरुस्ती विधेयकावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज राज्यसभेत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. 

🚩 २१ नोव्हेंबर 🚩**महाराष्ट्र हुतात्मा स्मृतिदिन,संयुक्त महाराष्ट्र साठी ज्या १०६ हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता बलिदान केले त्या सर्वांना विनम्र अभिवादन !

vishwatmaklokswamivarta