vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज 31 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन.

जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज 31 जानेवारीपर्यंत सादर करण्याचे आवाहन.

 

 

सांगली, प्रतिनिधी : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवारास अर्ज करतेवेळी जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने सन 2023-24 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमध्ये व पदविका तृतीय वर्षात शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज शैक्षणिक संस्थेच्या शिफारसीसह दि. 31 जानेवारी 2024 पर्यंत समिती कार्यालयाकडे सादर करावेत. शैक्षणिक संस्थांनाही विद्यार्थी, पालक यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून समितीकडे मुदतीत अर्ज सादर करण्याच्या सूचना निर्गमित कराव्यात, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी जयंत चाचरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

 

अर्जदारांनी bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा. महाविद्यालयीन शिफारसपत्र, 15A फॉर्मवर प्राचार्यांची सही, शिक्का व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीविषयक सर्व पुरावे व विहित नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावी. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी कागदपत्रांच्या / पुराव्यांच्या साक्षांकित प्रतींसह समितीकडे सादर करावी. अर्ज सादर करतेवेळी अर्जदार / पालक यांनी समक्ष मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहनही श्री. चाचरकर यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेना यांचे खासदार संजय राऊत 20 जानेवारीला जम्मू मध्ये राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार …

vishwatmaklokswamivarta

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष: नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरण: दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्रधर्म..थांबलाच नाही..साखळी कधी तुटली नाही…!ज्ञानेश्वरांच्या ओव्यांपासून, शिवरायांच्या तलवारीपर्यंत, महात्मा फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ

जलसंधारणाच्या प्रकल्पांच्या कायमस्वरूपीदुरुस्ती व देखभालकरिता नवीन धोरण आणणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

अलिबाग शहराला वाढीव पाणीपुरवठा करणारी योजना- मंत्री उदय सामंत

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनीमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा घेतला आढावा..

vishwatmaklokswamivarta