vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनीमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा घेतला आढावा..

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनीमुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा घेतला आढावा..

राज्य प्रतिनिधी

सांगली, : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी नंदिनी घाणेकर, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) संदीप यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी प्राप्त अर्ज व त्यावर केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. सर्व प्राप्त अर्ज निकाली काढण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. ज्यांच्या अर्जांना मान्यता दिली आहे पण अद्याप संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत अशा लाभार्थ्यांच्याबाबत मंत्रालयीन स्तरावर संबंधित विभागाकडे जिल्ह्याच्या डेटाबाबत मागणी करून त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

 

उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) संदीप यादव यांनी या योजनेबाबत सविस्तर माहिती देताना म्हणाले, नारी शक्ती दूत ॲपवर 4 लाख 59 हजार 725 अर्ज प्राप्त झाले होते, यामधील 4 लाख 52 हजार 727 अर्ज मंजुर करण्यात आले होते, 1 हजार 251 अर्ज रिजेक्ट तर 4 हजार 657 अर्ज अंशत: रिजेक्ट करण्यात आले होते. तर नव्याने निर्माण केलेल्या पोर्टलवर 2 लाख 62 हजार 911 प्राप्त अर्जापैकी 2 लाख 43 हजार 186 अर्जांना मान्यता देण्यात आली आहे, 10 हजार 416 अर्ज तात्पुरत्या स्वरूपात मंजूर केले असून 4 हजार 991 अर्ज तात्पुरत्या स्वरूपात रिजेक्ट केले आहेत. कार्यवाहीमध्ये 3 हजार 758 असून 560 अर्ज रिजेक्ट केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

संबंधित पोस्ट

फौजदारी प्रकरणातील कार्यवाहीबाबत महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण स्तुत्य – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

रायगड जिल्ह्यात ध्वनीक्षेपक आणि ध्वनीवर्धक वापरास वर्षभरात 15 दिवसांची विशेष परवानगी

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजाचे नाहीत;  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा खळबळजनक दावा…

vishwatmaklokswamivarta

पेंच अभयारण्यातील न्यू तोतलाडोह गावातील पुनर्वसनामुळे विस्थापित झालेल्या लोकांना नियमाप्रमाणे सर्व सुविधा देण्यात याव्यात, अशा सूचना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल

vishwatmaklokswamivarta

फक्त सत्याचाचं विजय होतो; समीर वानखेडे यांना क्लिन चीट मिळाल्यानंतर क्रांति रेडकर यांची प्रतिक्रिया

लव जेहाद प्रकरण: श्रद्धाचा मारेकरी आफताब याची तिहार जेलमध्ये रवानगी

vishwatmaklokswamivarta