
आताची मोठी बातमी: मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेस लोणावळ्यात 20 मिनिट रोखली; संतप्त नागरिक उतरले रुळावर..
राज्य प्रतिनिधी
पुणे लोणावळा लोकल फेऱ्या 11 ते 3 या वेळेत सुरू कराव्यात तसेच एक्सप्रेस गाड्यांचा थांबा लोणावळ्यात करावा या मागणीसाठी आज (शुक्रवार) स्थानिकांनी लोणावळा येथे रेल रोको आंदोलन करण्यात आले. पुण्याकडून मुंबईकडे जाणारी डेक्कन क्वीन एक्सप्रेस स्थानिकांनी तब्बल 20 मिनिटे रोखून धरली होती
आंदाेलना प्रसंगी रेल्वे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात हाेता. रेल्वे पोलिसांकडून स्थानिकांना रोखण्यात आले. मात्र तरी देखील स्थानिकांनी रुळावर उतरून डेक्कन क्वीन एक्सप्रेस रोखली. दरम्यान मोठ्या संख्येने नागरिक रेल्वे रुळावर उतरल्याने जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले
लांब पल्ल्यांच्या गाड्या आणि वंदे भारत रेल्वे लोणावळा येथे थांबवण्यात यावी तसेच पुणे लोणावळा लोकल फेऱ्या 11 ते 3 यावेळेत हव्यात अशी प्रमुख मागणी असल्याचे स्थानिकांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. दरम्यान आंदोलनकर्त्यांची पोलिसांनी समजूत काढल्यानंतर डेक्कन क्वीन एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने रवाना झाली.



