vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

महिला लोकशाही दिनाचे 15 जानेवारीला आयोजन

महिला लोकशाही दिनाचे 15 जानेवारीला आयोजन

 

            जालना, प्रतिनिधी- महिला व बाल विकास विभागाच्यावतीने समस्या व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळण्यासाठी त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्यात येतो. त्यानूसार जिल्हास्तरावर दि. 15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 ते 12 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु इच्छिणाऱ्या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतित महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जालना येथे दाखल करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

तालुकास्तरावर प्रत्येक तहसील कार्यालयात महिन्याच्या चौथ्या सोमवारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येतो. अर्ज तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, तक्रार दोन प्रतित सादर करावी, प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे, अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा, सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत.

 

निवडणुक आचार संहिता काळात त्या त्या स्तरावर, विधीमंडळ अधिवेशन काळात राज्यस्तरावर महिला लोकशाही दिन पाळण्यात येत नाही. महिलांनी प्रथम संबंधीत तहसीलदारांकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार दाखल करावी. तालुका महिला लोकशाही दिनात एका महिन्यांचे आत कार्यवाही न झाल्यास संबंधीत महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही दिनात अर्जदार महिलेस अंतिम उत्तर शक्य तितक्या लवकर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसीलदार व सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना राहील. महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन या उपक्रमाचा लाभ घ्यावा. असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील समुद्रकिनारी गस्त वाढवणे गरजेचे – महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे

सातारा येथील 14 कृषी सेवा केंद्रांवर कृषी विभागाची धडक कारवाई; परवाने कायमस्वरूपी केले रद्द…

जालना महानगरपालिकेच्या वतीने महिला दिन साजरा.

वनालगतच्या जमिनींवर सोलार कुंपणाची योजना विचाराधीन- वनमंत्री गणेश नाईक

राज्याच्या जलधी क्षेत्रात नियंत्रण ठेवण्यासाठी आता ड्रोनचा वापर- राज्यातील 07 सागरी जिल्ह्यातील 09 ठिकाणी पहिल्या ड्रोन प्रणालीचे उड्डाण..

vishwatmaklokswamivarta

सैन्याधिका-यांच्या पूर्वप्रशिक्षणासाठी अकोल्यात 13 जानेवारीला मुलाखती…