vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी; कार्यकर्ते शक्तिप्रदर्शनासाठी मुंबई मध्ये दाखल..

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी; कार्यकर्ते शक्तिप्रदर्शनासाठी मुंबई मध्ये दाखल..

 

मुंबई प्रतिनिधी

आमदार रोहित पवारयांची आज मुंबई मधील ईडी कार्यालयात (चौकशी होणार आहे. रोहित पवार चौकशीसाठी येणार असल्याने एनसीपीचे कार्यकर्ते शक्तिप्रदर्शनाच्या तयारीमध्ये आहेत. सूत्रांकडून मिळालेली माहिती

 

आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांची आज मुंबई मधील ईडी कार्यालयात (ED Enquiry) चौकशी होणार आहे. रोहित पवार चौकशीसाठी येणार असल्याने एनसीपीचे कार्यकर्ते शक्तिप्रदर्शनाच्या तयारीमध्ये आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार खासदार सुप्रिया सुळे रोहित पवारांसोबत ईडी कार्यालयापर्यंत येणार आहेत तर शरद पवार देखील रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत पक्ष कार्यालयामध्ये बसणार आहेत. दरम्यान रोहित पवारांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केले आहे. तसेच आपण ईडीला सहकार्य देणार असल्याची त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे

रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो या कंपनीच्या कार्यालयांमध्ये ईडीने छापेमारी केली होती. बारामती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणीच रोहित पवारांची ईडी चौकशी होत आहे. याबाबत मागील वर्षी पासून रोहित पवारांना नोटीस बजावण्यात येत आहे. ईडीकडून रोहित पवारांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित लिलाव प्रक्रियेमध्ये बारामती अ‍ॅग्रो कंपनीचा काही संबंध होता का? याविषयी ही चौकशी होणार आहे.

 

दरम्यान आज सकाळी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी रोहित पवार पक्ष कार्यालयामध्ये 10.30 च्या सुमारास शरद पवारांची भेट घेणार आहेत. सध्या शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची मुंबई मध्ये शक्तिप्रदर्शन करण्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

प्

संबंधित पोस्ट

मुंबईत होणार जागतिक मनोरंजन क्षेत्राचे ‘वेव्ज 2025’ संमेलन‘वेव्ज’ संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी राज्य शासनाचे संपूर्ण सहकार्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख -मुख्यमंत्र्यांनी आखलाय 100 दिवसांसाठी 7 कलमी कृती आराखडा,प्रशासनाला मिळतोय शिस्तीचा धडा…!

vishwatmaklokswamivarta

जे. जे. समूह रुग्णालयाच्या इमारत दुरुस्ती कामाचा पूर्ण मोबदला देणार-सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री यांनी मानले केंद्र सरकारचे आभार मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते’धरणांच्या देशा’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

महात्मा गांधी तंटामुक्त योजना मोहीम  नव्या रूपात! राज्य सरकार सादर करणार 

vishwatmaklokswamivarta