vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

अपघात की घातपात? मध्यप्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 ठार; 50 जण जखमी

अपघात की घातपात? मध्यप्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 6 ठार; 50 जण जखमी

 

: राज्य प्रतिनिधी मध्यप्रदेशमधल्या हरदा (Harda) इथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला, त्यानंतर कारखान्याला आग लागली यात सहा जणांचा मृत्यू झाल आहे. तर जवळपास 40 जणं गंभीर जखमी झाले आहेत. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. कारखान्यात आणखी काही लोकं अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही आग इतकी भीषण होती की आकाशात दूरदूरपर्यंत आगीचे लोळ दिसत होते. स्फोटानंतर परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार हरदातल्या मगरधा रोडवरच्या एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोटानंतर (Blast) आग लागली. आगीने भयंकर रुप धारण केलं. आसपासच्या अनेक घरंही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.

 

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव (CM Mohan Yadav) यांनी तात्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. फटाका कारखान्याला लागलेल्या आगीमागे घातपात आही की अपघात याचा पोलीस शोध घेत आहेत. आगीवर निंयत्रण मिळवण्यासाठी आसपासच्या परिसरातील अग्नीशमन दलाच्या गाड्या पाचारण करण्यात आल्या आहेत.

 

अपघात की घातपात?

मध्यप्रदेशमधल्या हरदा जिल्ह्यातील बैरागढ परिसरातील मगरधा रोडजवळच्या एका निवासी वस्तीत बेकायदेशी फटाका कारखान चालवला जात होता. त्यामुळे स्फोटानंतर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे. भर वस्तीत इतकी मोठा बेकादेशीर फटाखा कारखाना सुरु असतानाही प्रशासनाची नजर त्यावर कशी पडली नाही. 2015 मध्ये मध्य प्रदेशच्या झबुआमध्येही अशीच घटना घडली होती. त्यावेळी तब्बल 80 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. झाबुआ जिल्ह्यातील पेटलावदमध्ये सकाळी 8.30 वाजण्याच्या दरम्यान एका हॉटेलमध्ये स्फोट झाला होता. या हॉलेलच्या जवळच एका गोदामात स्फोटकांचा साठा ठेवण्यात आला होता. सकाळची वेळ असल्याने परिसरात लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. हॉटेलमध्ये स्फोट झाल्यानंतर गोदामातील स्फोटकांनी पेट घेतला आणि बघता बधता संपूर्ण परिसर बेचिराख झाला.

 

हरदातही भीषण स्फोट

हरदातही झाबुआ सारखीच घटना घडील आहे. आगीने भीषण रुप धारण केलं अअसून आसपासची अनेक घरं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहे. कारखान्यात अनेक लोकं काम करत होती. आगीमुळे ती आतमध्येच अडकली आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार एकामागोमाग एक अनेक स्फोट झाले. हे स्फोट इतके भीषण होते की त्याच्या आवाजाने आसपासच्या परिसरातील घरांनाही हादरे बसले.

 

मुख्यमंत्र्यांनी बोलावली आपातकालीन बैठक

घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपातकालीन बैठक बोलावली. मुख्यमंत्र्यांनी मंत्री उदय प्रताप सिंह, एसीएस अजीत केसरी, डीजी होमगार्ड अरविंद कुमार यांना तात्काळ हेलीकॉप्टरने घटनास्थळी देण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय भोपाळ आणि इंदोरमझल्या मेडिकल कॉलेज आणि एम्समध्ये बर्न युनिटला सज्ज राहाण्यास सांगण्यात आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी इंदोर आणि भोपाळमधल्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थानी पाठवण्यात आल्या आहेत.

संबंधित पोस्ट

कल्याण मधील बळीत मुलीच्या कुटुंबियांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट*

राष्ट्र प्रथम, करोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन , कारगिल विजय दिवस आणि ओलंपिक वर संबोधन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. 

पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सव साजरा करण्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे आवाहन,पर्यावरणपूरक गणेशोत्सव जनजागृती कार्यात स्वयंसेवी संस्थांना सहभागाचे आवाहन 

महाराष्ट्र शासनाचे चार, आठ आणि अकरा वर्षे मुदतीचे १,५०० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

vishwatmaklokswamivarta

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ या स्पर्धेत विश्वविजेता ठरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केला. भारताला प्रथमच #विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. 

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा : दसऱ्याच्या मुहूर्तावर शिंदे सरकारचा दुसरा मंत्रीमंडळ विस्तार? २३ मंत्र्यांचा उल्लेख करत कॅबिनेट मंत्री म्हणाले, “येणाऱ्या काही…”

vishwatmaklokswamivarta