vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी विटा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना

सांगली जिल्ह्यातील चार तालुक्यांसाठी विटा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची स्थापना

 

 

 

            राज्य प्रतिनिधी: सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, पलूस व कडेगाव या महसुली तालुक्यातील प्रकरणांसाठी ४ फेब्रुवारीपासून खानापूर तालुक्यातील विटा येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय स्थापन करण्यात आले असून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हे त्याचे पिठासीन अधिकारी असल्याची माहिती विधी व न्याय विभागाच्या विधी सल्लागार व सहसचिव विलास गायकवाड यांनी अधिसूचनेद्वारे दिली आहे.

 

सांगली जिल्ह्यातील खानापूर, आटपाडी, पलूस व कडेगाव या महसुली तालुक्यामध्ये समाविष्ट असलेल्या क्षेत्रातील दिवाणी व फौजदारी प्रक्रिया संहितेनुसारची प्रकरणे नव्याने निर्मित केलेल्या विटा येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात चालविण्यात येतील. ४ फेब्रुवारी २०२४ पासून या न्यायालयाची निर्मिती करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याचे प्रमुख सत्र न्यायाधीश हे फलटण येथील सत्र उपविभागाचे सत्र न्यायाधीश असतील, असे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

 

०००

संबंधित पोस्ट

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या महाराष्ट्र संघटकपदी विकासकुमार बागडी…

vishwatmaklokswamivarta

सैन्य दलातील अधिकारी -पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची संधी

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात सरासरी 14.7 मि.मी. पाऊस

महामंडळाच्या सर्व बसस्थानकांमध्ये तृतीयपंथीयांना,राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे- परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ [बसचे अपघात कमी करण्यासोबतच बस स्थानकातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे निर्देश]

vishwatmaklokswamivarta

अलिबाग-वडखळ मार्गावर शनिवार-रविवारी जड वाहनांची वाहतूक बंद पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा निर्णय..

दख्खन जत्रेतून स्वयंसहाय्यता बचत गटाच्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास प्रोत्साहन- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दख्खन जत्रा 2025 चे उद्‌घाटन- 21 मार्चपर्यंत सुरू राहणार प्रदर्शन