vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महामंडळाच्या सर्व बसस्थानकांमध्ये तृतीयपंथीयांना,राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे- परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ [बसचे अपघात कमी करण्यासोबतच बस स्थानकातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे निर्देश]

महामंडळाच्या सर्व बसस्थानकांमध्ये तृतीयपंथीयांना,राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे- परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ

[बसचे अपघात कमी करण्यासोबतच बस स्थानकातील स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे निर्देश]

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेसचे होणारे अपघात कमी करण्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात यावीत. राज्यातील सर्व बस स्थानकांवर तृतीयपंथीयांना राखीव स्वच्छतागृह उपलब्ध करून द्यावे. तसेच बस स्थानक परिसर स्वच्छ व उत्तम सोयी सुविधायुक्त ठेवण्यात यावा, असे निर्देश परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

एसटी महामंडळाच्या आढावा बैठकीचे आयोजन राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. बैठकीला परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.माधव कुसेकर, वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख, महाव्यवस्थापक नंदकुमार कोळकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी महामंडळाच्या बसचे होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत सूचना देत प्रवाशांसाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा आणि बसचे वाहक व चालक यांच्या मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या.

यासोबतच निवासस्थान प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचनाही दिल्या. बसस्थानक व लोकांना उत्तम सुविधा व सुरक्षित प्रवासासाठी आगामी काळात विविध उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचेही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

आताची मोठी बातमी- मुंबईतील चेंबूर येथील घटना टिळक नगर येथील पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सात्विक हॉटेल मध्ये तोडफोड…

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची घेतली भेट* 

कौटुंबिक समस्यांवर चर्चा, तोडग्या साठी,कौटुंबिक न्यायालयाकडून मार्गदर्शन- न्यायाधीश संजश्री घरत-कौटुंबिक न्यायालय कायदा कार्यकम संपन्न

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2025**सभापती आरक्षण सोडतीसाठी*विशेष सभा आयोजित*

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश राणे

vishwatmaklokswamivarta

मुख्य पोस्ट मास्टर जनरल, मुंबई या कार्यालयात 131 व्या डाक अदालतीचे आयोजन