vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जुनोनी येथील सिद्धेश्वर मंदीरात वैद्यकीय निसर्गोपचार शिबीराचे आयोजन

जुनोनी येथील सिद्धेश्वर मंदीरात वैद्यकीय निसर्गोपचार शिबीराचे आयोजन

 

सांगोला : प्रतिनिधी:  मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जि. सोलापूर, ता. सांगोला, जुनोनी गावात जिल्हा परिषद शाळा, सिद्धनाथ मंदीर येथे दि. ५ फेब्रुवारी २०२४ रोजी वैद्यकीय निसर्गोपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले.

शिबीराचे उद्घाटन डॉक्टर कांबळे,डॉक्टर राहुल, डॉक्टर  कोरे यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन प्रसंगी डॉक्टरांकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या तसबीरीला हार घालण्यात आला व नारळ फोडून निसर्गोपचार शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) सांगोला उप तालुका प्रमुख श्री. अरविंद पाटील, बाळासाहेब चोरमुले, सचिन पाटील, मच्छिंद्र तंडे, अण्णा सो बंडकर, दादासो होनमाने, सलीम मुलानी, पिनू शेटे, शिवाजी मदने, प्रभाकर हंकारे, रमेश हंकारे हिरण्मयी निसर्गोपचार केंद्राच्या संचालिका व तज्ज्ञ डॉक्टर पूर्णिमा हंकारे यांच्या उपस्थितीत वैद्यकीय निसर्गोपचार शिबीर पार पडले.

निसर्गोपचार शिबीरासाठी उपस्थित असणार्‍या २२-२५ महिला व पुरुषांवर त्यांच्या व्याधींच्या अनुषंगाने निसर्गोपचार तज्ञ डॉक्टर पूर्णिमा हंकारे यांच्याकडून उपचार करण्यात आले. सदर शिबीरासाठी ७०-७२ महिला व पुरुषांनी उपचारासाठी नोव नोंद केली होती. शिबीर सकाळी ११ वाजता सुरू होऊन सायंकाळी ६.०० वाजता सांगता झाली. उपस्थितांनी त्याचा लाभ घेतला. शिबीराच्या दोन दिवसांपूर्वी जुनोनी गावात ध्वनीक्षेपकाद्वारे निसर्गोपचार शिबीर जिल्हा परिषद शाळा, सिद्धनाथ मंदीर येथे होणार असल्याची माहिती देण्यात येत होती त्यामुळे मोठ्या संख्येने शिबीरासाठी उपस्थिती होती.

वैद्यकीय निसर्गोपचार शिबीरासाठी फारच चांगला प्रतिसाद मिळाल्याने हिरण्मयी निसर्गोपचार केंद्रातर्फे श्री. प्रभाकर हंकारे व रमेश हंकारे यांच्यावतीने आभार मानण्यात आले.

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते सामाजिक समता सप्ताहाचे उदघाटन,सामाजिक समता सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

धर्माबाद नगरपरिषद निवडणूक;इनानी मंगल कार्यालयातील प्रकाराची प्रशासनाकडून तात्काळ दखल…

vishwatmaklokswamivarta

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 /18-जालना लोकसभा मतदार संघाकरीता आतापर्यंत 19 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र केले दाखल,आज 24 नामनिर्देशन पत्रांची विक्री

डॉ. व्ही. एन. बेडेकर महाविद्यालयातील १७ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची झाली मतदार नोंदणी**उपविभागीय अधिकारी उर्मिला पाटील यांनी आयोजित केले विशेष शिबीर*

vishwatmaklokswamivarta

हातमाग व वस्त्रोद्योग पदविका अभ्यासक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन

कृषी सेवक परीक्षेची गुणवत्ता यादी प्रसिद्ध