vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय

राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय

 

        राज्य प्रतिनिधी    राज्यात जळगांव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन परावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले असून त्यादृष्टीने अशी नर्सिंग महाविद्यालये सुरु करण्यात येत आहे. या 6 शासकीय परिचर्या महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी सुमारे 173 कोटी 88 लाख इतका खर्च करण्यात येईल. तसेच पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष सुमारे 13 कोटी 99 लाख इतका निधी देण्यात येईल.

 

नंदुरबार व गोंदिया येथील परिचर्या महाविद्यालयांसाठी “Scheme for augmenting Nursing Education- Establishment of new Colleges of Nursing (CON) in co-location with Medical Colleges” या केंद्राच्या योजनेत प्रति परिचर्या महाविद्यालय रुपये १० कोटी इतका निधी देण्यात येईल. त्यापैकी केंद्र शासन ६० टक्के प्रमाणे रुपये ६ कोटी व राज्य शासन ४० टक्के प्रमाणे ४ कोटी निधी देणार आहे. बांधकाम, फर्निचर, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च इ.साठी प्रति परिचर्या महाविद्यालय 32 कोटी 97 लाख आवश्यक असून या खर्चासही मान्यता दिली आहे.

 

जळगांव, लातूर, बारामती व सांगली (मिरज) या परिचर्या महाविद्यालयांसाठी बांधकाम, फर्निचर, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च इ.साठी अंदाजे 107 कोटी 94 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने आवश्यक पदे भरण्यात येतील.

 

—–०—–

संबंधित पोस्ट

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आणखी एका प्रकरणात दिलासा, कारवाई करण्यास मनाई….

गौतम अदानी जागातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती, बर्नार्ड अरनॉल्ट यांना टाकले मागे; ब्लूमबर्क बिलेनीयर्स इंडेक्स अहवाल प्रसिद्ध

विशेष लेख-स्मार्ट व इंटेलिजंट गावांकडे महाराष्ट्राची वाटचाल‘सातनवरी’ ठरले देशातील पहिले स्मार्ट व इंटेलिजंट गाव…

उदयपूर येथील कन्हैया लालच्या हत्येतील चार आरोपींना न्यायालयाबाहेर जमावाकडून मारहाण

मुंबईतील लोकल दहशतवाद्यांच्या रडारवर, रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दल मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क, 

vishwatmaklokswamivarta

14 सप्टेंबर रोजी जिओ पारसी कार्यशाळेचे आयोजन पारशी समुदायासह केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री साधणार संवाद..

vishwatmaklokswamivarta