vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याव्यवसाय

राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय

राज्यात सहा ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय

 

        राज्य प्रतिनिधी    राज्यात जळगांव, लातूर, बारामती, सांगली (मिरज), नंदुरबार व गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (नर्सिंग महाविद्यालय) सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

 

राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन परावैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले असून त्यादृष्टीने अशी नर्सिंग महाविद्यालये सुरु करण्यात येत आहे. या 6 शासकीय परिचर्या महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी सुमारे 173 कोटी 88 लाख इतका खर्च करण्यात येईल. तसेच पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष सुमारे 13 कोटी 99 लाख इतका निधी देण्यात येईल.

 

नंदुरबार व गोंदिया येथील परिचर्या महाविद्यालयांसाठी “Scheme for augmenting Nursing Education- Establishment of new Colleges of Nursing (CON) in co-location with Medical Colleges” या केंद्राच्या योजनेत प्रति परिचर्या महाविद्यालय रुपये १० कोटी इतका निधी देण्यात येईल. त्यापैकी केंद्र शासन ६० टक्के प्रमाणे रुपये ६ कोटी व राज्य शासन ४० टक्के प्रमाणे ४ कोटी निधी देणार आहे. बांधकाम, फर्निचर, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च इ.साठी प्रति परिचर्या महाविद्यालय 32 कोटी 97 लाख आवश्यक असून या खर्चासही मान्यता दिली आहे.

 

जळगांव, लातूर, बारामती व सांगली (मिरज) या परिचर्या महाविद्यालयांसाठी बांधकाम, फर्निचर, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च इ.साठी अंदाजे 107 कोटी 94 लाख इतका खर्च अपेक्षित आहे. उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने आवश्यक पदे भरण्यात येतील.

 

—–०—–

संबंधित पोस्ट

हिंदूंना बदनाम करणार्‍या ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या संबंधित सर्व अधिकार्‍यांना निलंबित करावे, अशी मागणी *हिंदु जनजागृती समितीचे कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये* यांनी केली

मरावे परी देहरुपी उरावे..!अवयवदान करा.. अवयवदान करा..!कविवर्य मंगेश पाडगांवकर यांनी रचलेल्या कवितेतील पुढील ओळी जीवनाचा खरा अर्थ सांगणारी आहे…

vishwatmaklokswamivarta

अण्णा भाऊ साठे शिष्यवृत्ती” योजनेचा लाभ घेण्यासाठी मातंग समाजातील विद्यार्थी/विद्यार्थीना दि.20 जुलै 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्याचे आधार कार्ड असावे व विद्यार्थ्याच्या बँक खात्याशी आधार , कार्ड संलग्न असावे .8. विद्यार्थीची ज्या प्रवर्गातून निवड झाली आहे त्या प्रवर्गातूनच शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरावा..

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो’ ला विद्यार्थी आणि उद्योजकांनी भेट द्यावी-उद्योगमंत्री उदय सामंत

vishwatmaklokswamivarta

जमिन सुधारणा उपाययोजना राबवा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta