vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

स्वीप मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रमाव्दारे जनजागृती  

स्वीप मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रमाव्दारे जनजागृती

 

 

 

सांगली प्रतिनिधी: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यात मतदार जागृतीसाठी मोहिम राबविण्यात येत असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी स्वीपच्या (SVEEP) माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 7 मे 2024 रोजी मतदान होत आहे. सात मे रोजी लोकशाहीचा उत्सव पार पडत आहे. या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे. यासाठी स्वीप मोहिमेअंतर्गत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यातील मिरज येथील गोसावी गल्ली, उत्तम नगर, कवठेमहांकाळ येथील शाळा क्रं. 1 व 3, शेटफळे हायस्कूल, न्यू इंग्लिश स्कूल-कुंभारी, जत तालुक्यातील जाडरबोदलाद येथील गजानन हायस्कूल, मौजे नागज, थबडेवाडी, निमज, खरशिंग, खानापूर तसेच आटपाडी तालुक्यातील भवानी हायस्कूल, बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आदी ठिकाणी मतदान टक्का वाढावा यासाठी रांगोळी तसेच चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. प्रशासनाच्या या उपक्रमाबद्दल जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी समाधान व्यक्त केले.

 

त्या प्रयत्नाचे फलित म्हणून जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश मतदानाची टक्केवारी वाढावी असा असून या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यांमध्ये रांगोळी, चित्रकला स्पर्धा, सायकल रॅली, मतदार व महिला मेळावा त्याचबरोबर जनजागृती फेरी आदी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

 

 

 

000

संबंधित पोस्ट

सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेमार्फत कंत्राटी पध्दतीने नेमणूकीसाठीनोंदणीकृत पात्र व इच्छुक सेवा सोसायट्यांनी प्रस्ताव करण्याचे आवाहन

अटकावून ठेवलेल्या जप्त वाहनांचा ई-लिलाव इच्छुकांनी ई-लिलाव प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा

दिवाळीत प्रवास महागणार – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तिकीट दरात वाढ

डिजीटल मार्केटींगवर मोफत प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

पद्म पुरस्कार-२०२६ साठी नामांकन सादर करण्यासाठी अंतिम मुदत; १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवली

दलित आयपीएस अधिकारी पुरण कुमार यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांची भेट… दिवंगत पुरण कुमार यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट

vishwatmaklokswamivarta