vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिवाळीत प्रवास महागणार – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तिकीट दरात वाढ

दिवाळीत प्रवास महागणार – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तिकीट  दरात वाढ

राज्य प्रतिनिधी-महाराष्ट्रराज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिवाळी हंगामासाठी तिकीट दरांमध्ये दहा टक्के हंगामी भाडेवाढ जाहीर केली आहे. ही वाढ दिनांक १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२५ या वीस दिवसांच्या कालावधीत लागू राहणार आहे. यामुळे एसटीच्या तिजोरीत अंदाजे एक हजार ते एक हजार शंभर कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याची अपेक्षा आहे.

भाडेवाढीमुळे राज्यातील लांब पल्याच्या प्रवासात साधारणतः नव्वद ते शंभर रुपयांची वाढ होईल. उदाहरणार्थ, मुंबई-कोल्हापूर मार्गावरील तिकीट सहाशे चाळीस रुपयांवरून सातशे रुपयांपर्यंत वाढेल. मुंबई-मालवण मार्गावरील शिवशाहीची तिकीट एक हजार तीनशे रुपयांवरून एक हजार चारशे रुपयांपर्यंत वाढेल. मुंबई-जळगाव मार्गावरील स्लीपरची तिकीट एक हजार शंभर रुपयांवरून एक हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत वाढेल.दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढते, त्यामुळे एसटी महामंडळाने दिनांक १५ ऑक्टोबरपासून वाढीव बसगाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाढीव बसगाड्या दिनांक ५ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहतील. त्यानुसार, साधी, विठाई, शिवशाही, निमआराम या बससेवांसाठी भाडेवाढ लागू होईल. तथापि, मुंबई-पुणे मार्गावरील शिवनेरी बससेवांसाठी भाडेवाढ लागू होणार नाही.

एसटी महामंडळाने दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळी हंगामात गर्दीच्या काळात उत्पन्न वाढीसाठी हंगामी भाडेवाढ केली आहे. गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याची एसटी महामंडळाला परवानगी आहे, आणि त्यानुसार ही तात्पुरती भाडेवाढ केली जाते.

संबंधित पोस्ट

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे-  रोहयो मंत्री भरत गोगावले

पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या पायाभूत सुविधांचा पहिला टप्पा पूर्ण;केंद्रीय सचिव नीलम शमी राव यांनी केली पाहणी

मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण,मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स अकाउंट वर माहिती दिली आहे

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी समागम चित्ररथाचे उद्घाटन पोहरागडाचे महंत सुनीलजी महाराज करणार प्रबोधन

vishwatmaklokswamivarta

कर्तव्यदक्ष आमदार श्री. रमेशअप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली एकात्मिक आरोग्य वर्धिनी समितीची पहिली बैठक संपन्न; आरोग्य सेवांचा गुणात्मक दर्जा वाढविण्याच्या दिल्या सूचना…👏🏥

उत्तरकाशी इथं झालेल्या ढगफुटीनंतर मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु, १३० जणांची सुटका.