vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाबाबत पक्षकार, वकीलांनी संमती अर्ज सादर करावेत

सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाबाबत पक्षकार, वकीलांनी संमती अर्ज सादर करावेत

 

            सांगली प्रतिनिधी : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने सर्वोच्च न्यायालयात 29 जुलै 2024 ते 3 ऑगस्ट 2024 दरम्यान विशेष लोकआदालत सप्ताहाचे आयोजन केले आहे. या लोक अदालतीमध्ये सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे प्रलंबित असलेल्या प्रकरणाबाबत जिल्ह्यातील पक्षकार किंवा त्यांच्या वकीलांनी त्यांचे संमती अर्ज संपर्क कमांक आणि ईमेल पत्त्यासह जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या sangli-disa.mh@bhc.gov.in या ईमेलवर किंवा प्रत्यक्षरित्या सादर करावेत, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष पी. के शर्मा यांनी केले आहे.

 

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने सांगली जिल्ह्यातील प्रलंबित प्रकरणांपैकी काही प्रलंबित प्रकरणांची यादी जिल्हा न्यायालयाच्या https://sangli.dcourts.gov.in/ या संकेत स्थळावर प्रकाशीत केली आहे. यामध्ये जिल्ह्यातील 5 प्रकरणांचा समावेश असून ही प्रकरणे विशेष लोकअदालतीमध्ये निकाली काढण्यात येणार आहेत विशेष लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणांबाबत जिल्ह्यातील 16 नोटीसा पक्षकारांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत बजावण्यात आल्या आहेत. तडजोडीच्या चर्चेची तारीख पक्षकार आणि वकीलांना दिली जाईल. पक्षकार प्रत्यक्षपणे किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे देण्यात येणाऱ्या लिंकवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित राहू शकतात, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गि. ग. कांबळे यांनी कळविले आहे.

 

00000

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्र्यांची बनावट सही, शिक्का वापरल्याची बाब गंभीर,प्रकरणाची गंभीर दखल ; दोषींवर कठोर कारवाई करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

भाजपा जालना महानगरच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती एकता दौड ने साजरी..

vishwatmaklokswamivarta

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून नाशिक – त्र्यंबकेश्वर रस्त्याची पाहणी

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्यातील वर्षभरापासून चर्चेत, आज बैलगाडा शर्यतीची सुप्रीम कोर्टात सुनावणी..

vishwatmaklokswamivarta

अमरनाथ यात्रेची जोरदार तयारी, यात्रेकरूच्या आरोग्याची चिंत्ता मिटली, यात्रेकरूंसाठी 100 खाटांच्या दोन रुग्णालयाचं उद्घाटन…जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जास्तीत जास्त पात्र महिलांनी अर्ज करावेत  –महिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे