vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सनलाईट हॉस्पिटलमधील बालिकेच्या मृत्यूप्रकरणीचीआरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी– मंत्री उदय सामंत

सनलाईट हॉस्पिटलमधील बालिकेच्या मृत्यूप्रकरणीचीआरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी– मंत्री उदय सामंत

 

मुंबई, प्रतिनिधी भिवंडी (जि. ठाणे) येथील सनलाईट हॉस्पिटलमध्ये बालिकेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित हॉस्पिटलची आरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

 

सदस्य रईस शेख यांनी यासंदर्भात नियम 94 अन्वये अर्धा तास चर्चेद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. सामंत म्हणाले की, या प्रकरणात एका बालिकेचा बळी गेला ही दुर्दैवी घटना आहे. याबाबत सदस्यांनी दिलेल्या सर्व माहितीच्या अनुषंगाने या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाचे जाणूनबुजून दुर्लक्ष झाले असेल, तर त्याबाबत आरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी करण्यात येईल. राज्यात अशाच प्रकारच्या मेडिकल निग्लिजन्सच्या घटना घडल्या असतील, तर आवश्यकता पडल्यास राज्यस्तरीय चौकशी समिती नेमण्यात येईल.

 

दरम्यान, या प्रकरणात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनही संबंधितांना पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारीबाबत विभागीय आयुक्तांद्वारे याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

 

००००

संबंधित पोस्ट

मुख्यमंत्रीःमाझी लाडकी बहिण योजना २ लाख ९० हजार ८७१ बहीणींच्या अर्जांना मान्यता.

मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना : गरीब कुटुंबांना मिळणार 3 गॅस सिलेंडर मोफत योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी 

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ भरारी पथकाने अथवा स्थिर संनिरीक्षण चमू किंवा पोलीस अधिका-यांनी जप्त केलेल्या रकमांचा परतावा करणेसाठी समिती गठीत…

इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या सीएसआर निधी अंतर्गत खरोळा सर्कलमधील 2 ग्रामपंचायतीला मिळणार प्रत्येकी 75 लाख रुपयांचा निधी…आमदार श्री. रमेशअप्पा कराड साहेबांच्या प्रयत्नांना मोठं यश!

vishwatmaklokswamivarta

वैश्विक हिंदू राष्ट्र,महोत्सवप्रसिद्धीपत्रक* जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम २४ ते ३० जून या कालावधीत गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ *संविधान-विरोधी, देशविरोधी शक्तींना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज,