vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सनलाईट हॉस्पिटलमधील बालिकेच्या मृत्यूप्रकरणीचीआरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी– मंत्री उदय सामंत

सनलाईट हॉस्पिटलमधील बालिकेच्या मृत्यूप्रकरणीचीआरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी– मंत्री उदय सामंत

 

मुंबई, प्रतिनिधी भिवंडी (जि. ठाणे) येथील सनलाईट हॉस्पिटलमध्ये बालिकेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी संबंधित हॉस्पिटलची आरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिली.

 

सदस्य रईस शेख यांनी यासंदर्भात नियम 94 अन्वये अर्धा तास चर्चेद्वारे प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री श्री. सामंत म्हणाले की, या प्रकरणात एका बालिकेचा बळी गेला ही दुर्दैवी घटना आहे. याबाबत सदस्यांनी दिलेल्या सर्व माहितीच्या अनुषंगाने या प्रकरणी हॉस्पिटल प्रशासनाचे जाणूनबुजून दुर्लक्ष झाले असेल, तर त्याबाबत आरोग्य विभागाच्या उपसंचालकांमार्फत चौकशी करण्यात येईल. राज्यात अशाच प्रकारच्या मेडिकल निग्लिजन्सच्या घटना घडल्या असतील, तर आवश्यकता पडल्यास राज्यस्तरीय चौकशी समिती नेमण्यात येईल.

 

दरम्यान, या प्रकरणात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनही संबंधितांना पैशाची मागणी होत असल्याच्या तक्रारीबाबत विभागीय आयुक्तांद्वारे याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती मंत्री श्री. सामंत यांनी दिली.

 

००००

संबंधित पोस्ट

ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी संबंधित विभागांची एकत्रित बैठक घेऊ- सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मानवाची आध्यात्मिक भूक भागविण्यासाठी वेद, गीतेकडे परतण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत वेदश्री तपोवन मोशी येथे गीता जयंती महोत्सवाला राज्यपालांची उपस्थिती

vishwatmaklokswamivarta

द्रौपदी मुर्मू झाल्या भारताच्या नव्या राष्ट्रपती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिनंदन .

राकाँपा प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांची गुरुवारी भव्य जाहीर प्रचार सभा

vishwatmaklokswamivarta

गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा पहिला सण.. हा सण म्हणजे मांगल्याचा..चैतन्याचा दिवस, साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त….

कराड व कोयनानगर येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन