vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीप्रदेश

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत शुभसाद सुपर अबॅकसचे सुयश

राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत शुभसाद सुपर अबॅकसचे सुयश

 

चिखली, प्रतिनिधी- राज्यस्तरीय सुपर अबॅकस स्पर्धेचे आयोजन ७ जुलै रविवार छ. संभाजीनगर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून सुपर अबॅकसच्या ३६० केंद्रांमधून जवळपास १००० विद्यार्थ्यांनी विविध लेवल मध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये चिखली येथील शुभसाद सुपर अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला होता. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून तनिषा मनीष अग्रवाल हिने लेवल १ गट २ मधून २ रा क्रमांक तरभक्ती भरत बावणे हिने लेवल १ पार्ट गट २ मधून ५ वा क्रमांक पटकावला.

अबॅकस या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी व मुलांना उच्चप्रतीचे शिक्षण देत असल्याबद्दल शुभसाद सुपर अबॅकस अकॅडमीचे संचालक प्रसाद अनंत उरसाल व संचालिका शुभांगी प्रसाद उरसाल यांना विदर्भ विभागातून अत्यंत मानाचा महाराष्ट्र प्राईड पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात आले. छ. संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे हा भव्यदिव्य सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. पायल चोबे, छ. संभाजीनगरचे माजी उपमहापौरशिवसेना (शिंदे गट) जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ, सुपर अबॅकसचे संस्थापक अध्यक्ष मनीष महाजन यांच्या हस्ते पारितोषिके व पुरस्कार प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाला सर्व विभागाचे प्रमुख, सुपर अबॅकस ची टीम, सर्व केंद्रचालक तसेच पालक व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच शुभसाद सुपर अबॅकस अकॅडमी चिखलीच्या विद्यार्थ्यांनी व संचालकांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.

सोबत फोटो – छ. संभाजीनगर येथे पुरस्कार स्वीकारताना शुभसाद सुपर अबॅकस अकॅडमीचे प्रसाद उरसाल, शुभांगी उरसाल व प्रमाणपत्रासहीत विद्यार्थिनी

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयात सुवर्णसंधी

vishwatmaklokswamivarta

जन्म / मृत्यु प्रमाणपत्रासाठी स्वयंघोषणा पत्रासाठी अफीडेव्हीट / नोटरीची अट रद्द करा.काँग्रेस माथाडी कामगारचे मराठवाडा सरचिटणीस सय्यद अश्फाक अली यांनी घाटी दवाखान्याचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांना निवेदन दिले 

पुढील वर्षासाठीच्या 820 कोटींच्या प्रारूप विकास आराखड्यास मान्यता* – *पालकमंत्री शंभूराजे देसाई*

vishwatmaklokswamivarta

इतर मागास बहूजन कल्याण-:शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत शेतकऱ्यांच्या समावेशासाठी विशेष मोहिमेचे आयोजन प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

मतदानाच्या दिवशी धावपळ होते. मग Voter Helpline App द्वारे आपले मतदान केंद्र जाणून घ्या.

vishwatmaklokswamivarta