vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

 

 

            मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

 

मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे आहेत. शहरी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये ७८३ अंगणवाडी मदतनीसांची रिक्त पदे आहेत. त्यानुसार ३१ ऑगस्ट २०२४ अखेरपर्यंत राज्यातील १४ हजार ६९० मदतनीसांची रिक्त पदे भरण्यात यावीत, अशा सूचना सर्व जिल्हा व प्रकल्पस्तरावर देण्यात आल्या आहेत.

 

याबाबतची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. इच्छुक महिलांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन मंत्री कु. तटकरे यांनी केले आहे.

 

००००

संबंधित पोस्ट

देशभरातील बँकांच्या प्रस्तावित खाजगीकरणाविरोधात बँक संघटनांनी पुढील आठवड्यात दोन दिवसांचा संप पुकारला आहे.

vishwatmaklokswamivarta

टीटीसी औद्योगिक क्षेत्रातील एमआयडीसी भूखंड व अनाधिकृत बांधकामबाबत लक्षवेधी सूचना प्रकरणात उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केली प्रत्यक्ष स्थळपाहणी…

मोठी बातमी: बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाचा संसर्ग, रुग्णालयात  दाखल …

vishwatmaklokswamivarta

राज्यात जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट; वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, मुंबईसह  उपनगरात पहाटेपासून मुसळधार पाऊस

महाराष्ट्र राज्याचे *उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बने उडवण्याची धमकी…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये नवी मुंबई महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था गटात देशात प्रथम

vishwatmaklokswamivarta